Last Updated on January 8, 2023 by Taluka Post
Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती
सिन्नर(Sinnar Nagar Parishad) : कडवा धरणातून करण्यात •आलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास शुक्रवारी घडला. पहाटेच्या सुमारास विद्युत जलपंप बंद करण्यात आले. मात्र तोपर्यंत हजारों लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. त्यात शेतकऱ्यांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. कडवा धरणातून सिन्नर शहर व उपनगरांसाठी पाणीयोजना राबविण्यात आली आहे.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शिवडे शिवारात संजय बोऱ्हाडे यांच्या शेताजवळ एअर वॉलला गळती लागली. त्यामुळे बो-हाडे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात साचले. सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते उत्तम हारक यांनी पाणीपुरवठा अभियंता हेमलता देसरे यांना दिली. त्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तोपर्यंत एअर वॉलमधून मोठया प्रमाणात पाणी वाया गेले. बोहाडे यांच्या शेतातील गहू व मका पिकाचे यामुळे नुकसान झाल्याचे समजते.
पश्चिम भागात मुख्य जलवाहिनी अनेकदा फुटण्याचे प्रकार
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर नगर परिषदेचे पाणीपुरवठा दुरुस्तीचे पथक शिवडे शिवारात घटनास्थळी सकाळी दाखल झाले. एअर वॉलची दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
यावेळी रस्त्याची जेसीबीच्या साहाय्याने दुरुस्तीही करण्यात आल्याची माहिती पाणीपुरठा अभियंता हेमलता देसरे यांनी दिली. दरम्यान, यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीने जमिनीवरील भराव वाहून
सिन्नर र परिषदेची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार याआधीही झाले आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर जलवाहिनी शिवडे गावातून टाकण्यात आली आहे. गावात सदर जलवाहिनी फुटल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात जीवितहानी व घरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर जलवाहिनी गावातून स्थलांतरीत करण्याची गरज आहे. याबाबत अनेकदा निवेदनही देण्यात आली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.उत्तम हारक, सामाजिक कार्यकर्ते, शिवडे, ता. सिन्नर
हेही वाचा: Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर