
Last Updated on December 6, 2022 by Taluka Post
सिन्नर: सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी व नाशिक जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात यापूर्वीचा राज्य केसरी विजेता हर्षल सदगीर हा मॅट प्रकारात, तर सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचा बाळासाहेब बिन्नर मातीतील कुस्ती स्पर्धेत अजिंक्य ठरले. त्यांची राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सिन्नर येथे कुस्ती स्पर्धेतील हर्षल सदगीर व बाळासाहेब बिन्नर या विजेत्यांना चांदीची गदा देऊन गौरव करताना पालकमंत्री दादा भुसे. समवेत शीतल सांगळे, जयवंत जाधव, पुंजाभाऊ सांगळे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उद्योगमंत्री उदय सामंत, उदय सांगळे आदी.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व आयुष विधे यांच्यात मॅट प्रकारात कुस्ती झाली. त्यात हर्षल अजिक्य ठरला. मातीच्या कुस्तीत बाळासाहेब बिन्नर व अमोल कांदळकर यांच्यात लढत झाली. यामध्ये सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचा बाळासाहेब बिन्नर विजेता ठरला पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सदगीर व चिन्नर यांना चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. माजी आमदार राजाभाऊ वाजे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंत जाधव, सत्यजित तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, युवा नेते उदय सांगळे, तालीम संघाचे गोरक्षनाथ बलकवडे, उत्तम दळवी, रवींद्र मोरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक हेमंत वाजे आदी उपस्थित होते.
माती प्रकारात भावेश कांदळकर (५१ किलो), शुभम शिंदे (६१), नामदेव दिवे (६५), नीलेश जाधव (७०), सय्यद आसिफ (७१). धर्मा शिंदे (७९). नितीन बेजेकर (८६), रोहन परदेशी (९२). मोहम्मद कैफ ९७) विजेते. ठरले. मॅट प्रकारात आकाश पगारे (५१), पवन दोन्नर (६१), भाऊसाहेब सदगीर (६५), मनोज देवरे (७०) हरीश पवार (७१). गौरवं देवरे (७९). रोहित अहिरे (८६), बाळासाहेब बोडके (८६). विकास मोरे हे विजेते ठरले. कुमार गटात गौरव वारघडे, प्रदीप कडु, वैभव तुपे, तुषार साठवते. दीपक देवकर, ऋतिक सामोरे यांनी विजय मिळविला.