सिन्नर : प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका गरजेची

Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.

पालकमंत्री भुसे सिन्नरला सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे लोकार्पण

सिन्नर : सिन्नरला सह्याद्री युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी क्रीडा प्रबोधिनी व अभ्यासिकेसारखे आदर्श उपक्रम उभे राहिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. सह्याद्री युवा मंचचे संस्थापक उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून मैदानी व मॅटवरील विविध खेळांसाठी ही क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात आली आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आ. राजाभाऊ वाजे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंत जाधव, युवा नेते सत्यजित तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, युवा नेते उदय सांगळे, जि. प. च्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, मविप्रचे माजी संचालक हेमंत वाजे, नामकर्ण आवारे, माजी उपसभापती संग्राम कातकाडे, पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, सोमठाणेचे सरपंच भारत तालुक्यात क्रीड सह्याद्री युवा कोकाटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय संकल्पनेतून केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आदी माजी आमदार यावेळी उपस्थित होते.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

दादा भुसे म्हणाले, क्रीडा प्रबोधिनीमुळे तालुक्यातील खेळाडूंना लाभ होणार असून, खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाल्या तरच उत्कृष्ट क्रीडापटू तयार होतील. खेळाडूंची नेमकी गरज ओळखून चांगले काम उभे केल्याबद्दल उदय सामंत यांनी सांगळे यांचे कौतुक केले. सांगळे वांनी अभ्यासिका सुरू करून स्पर्धा परीक्षांसाठी युवकांना संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी आणि अभ्यासिका उभी राहिली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करू, असे माजी आमदार वाजे यांनी सांगितले.
उद्योगमंत्री सामंत यांनी सेझच्या पाच हजार हेक्टर जागेवर नव्याने उद्योग कसे आणता येतील त्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील उद्योगांना चालना मिळावी यासाठी शिद-फडणवीस सरकारकडून हवी ती मदत मिळेल, अशी ग्वाही दिली.

सांगळे उदय सांगळे म्हणाले, येथील सेझचा प्रकल्प सुरू न झाल्याने येथील उद्योगधंद्यांना चालना मिळू शकली नाही. त्यामुळे सेझच्या जागेवर नवीन मोठा उभी प्रकल्प आणावा अशी मागणी उद्योगमंत्र्यांकडे असे केली. सरकार वेगवेगळ्या उद्योग समुहासोबत करार करत आहे. सेझवर नवीन प्रकल्प आल्यास हजार येथील विकासाला चालना मिळेल. तालुक्यातून येतील समृद्धी महामार्ग, रेल्वे, नव्याने होऊ घातलेला ल्याचे सूरत-चेन्नई महामार्ग जवळ असून, त्यामुळे सावी उद्योग उभारणीसाठी येथे चांगले वातावरण आहे. न्वी तो याकडे सांगळे यांनी सामंत यांचे लक्ष वेधले. जयंत जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. किरण मिठे प्रकल्प यांनी सूत्रसंचालन केले. बंडूनाना भाबड यांनी मिळू आभार मानले.

Comments are closed.