Last Updated on December 10, 2022 by Taluka Post
Sinner: सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात नाशिकच्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर काळाचा घाला महामार्गावर वाहतूक कोंडी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर : नाशिक-सिन्नर महामार्गावर मोहदरी घाटात शुक्रवारी (दि.९) सायंकाळी वाजेच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणात्या पाच विद्याथ्र्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक येथील ८ विद्यार्थी स्विफ्ट कार क्र. एम. एच. ०३/ ए. आर. १६१५ मित्राच्या लग्नासाठी संगमनेर येथे गेले होते. परतताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचे टायर फुटले चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार वेट डिव्हायडर तोडून तीन ते चार वेळा उलटली. याचवेळी कार विरुद्ध दिशेच्या लेनवर आली.
त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या एम. एच. १२- एस. एफ. ४५४२ स्विफ्ट कारवर आणि पाठीमागून येणाऱ्या इनोवा कार क्र. एम. एच. १८/ ए. एन. १४४३ वर आदळली. अपघातात विद्यार्थ्यांच्या कारमधील साक्षी घायाळ, साहिल वारके, गायत्री फरताळे व कारचालक सुनील ज्ञानेश्वर दळवी हे जखमी झाले आहे. जखमी साक्षी व साहिल या विद्याथ्र्यांवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अन्य जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात ऐन विशीतील पाच मित्रांचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. विद्याथ्र्यांच्या कारमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करित होते. अपघातातील मृत केटीएचएम, ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालय, भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. अपघाताची माहिती कळताच हर्ष याच्या आईने रुग्णालयात एकच हंबरडा फोडला.
या विद्यार्थ्यांचा झाला मृत्यू
भीषण अपघातात विद्यार्थ्यांच्या कारमधील हर्ष दीपक बोडके (१७) रा. कामटवाडा नाशिक, सायली अशोक पाटील [१७] रा. राणेनगर, नाशिक, प्रतीक्षा दगु घुले रा. पाथर्डी फाटा, नाशिक, शुभम तायडे रा. शिवशक्ती चोक, सिडको, नाशिक केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेणारे तसेच मयूरी अनिल पाटील, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक यांचा जागीच मृत्यू झाला. मदूरी ही मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालय ओडा या ठिकाणी शिक्षण घेत होती. अपघातात कारचा अक्षरश: चंदामेंदा झाला आहे.
घाटात पुन्हा रात्री अपघात
विद्यार्थ्यांच्या अपघातानंतर मोहदरी घाट परिसरात शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास कार व गैस सिलिडर वाहतूक करणाच्या ट्रकमध्ये अपघात झाला. सिन्नरकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एम. एच. ०६ ए. क्यू. ५६२३ चालला असताना पाठीमागून आलेल्या कार क्रमांक एम. एच. १७ सी. एम. १६४७ ने ट्रकला धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.हेही वाचा: सिन्नर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा;तरच ‘समृद्धी’चे उद्घाटन..!