Saturday, March 2

Sinner Belu: बेलू येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

Last Updated on December 22, 2022 by Taluka Post

Sinner Belu: बेलू येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर : तालुक्यातील बेलू (Sinner Belu)गावात बिबट्याने शेळीवर झडप घालून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बेलू येथील रोशन एकनाथ वाघ (वय १७) हा दुपारी अडीचच्या सुमारास कडवा नदीजवळ शेळ्यांना पाणी पाजत होता.

नदीच्या कडेला केशव जयराम तुपे यांचे गट नंबर ४६८ मध्ये दोन एकर उसाचे शेत आहे. याच उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला चढवला. दरम्यान जीव वाचवण्यासाठी शेळ्यांबरोबर असलेल्या रोशनने तेथून काही अंतरावर पळ काढला. यावेळी बिबट्याने शेळीची मान जबड्यात धरून तिला उसाच्या शेतात नेले. याबाबतची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर पांढुर्ली वन परिमंडळ अधिकारी आर. आर. सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस. एन. गाढवे, रमेश कौटे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. अधिकारी मनीषा जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: Sinner-shirdi : मृत गोवंशच्या अवशेषांची वाहतूक