Monday, February 26

Sinner Crime news : आरोपीच्या घरासमोरच रचली मृतांची चिता; नाशिकमध्ये खळबळ

Last Updated on May 31, 2023 by Jyoti Shinde

Sinner Crime news

Sinner Crime news: नाशिक जिल्यातील इगतपुरी तालुक्यातील आई-वडिलांसमोर मुलीचे अपहरण झाल्यानंतर हताश दाम्पत्याने रेल्वेखाली आत्महत्या केली.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील इगतपुरी येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोळ्यांसमोर मुलीचे अपहरण झाल्याने हताश झालेल्या पालकांनी रेल्वेखाली आत्महत्या करून आपले प्राण सोडले. मात्र, मृत दाम्पत्यावर मुलीच्या घरच्यांनी अपहरणकर्त्याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सिन्नर तालुक्यातील इगतपुरीत खळबळ उडाली आहे. Sinner Crime news

हेही वाचा: Disadvantages of eating curd : लक्ष द्या! तुम्ही पण रोज दही खाता का? त्यामुळे ही चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते.

काय प्रकरण आहे?

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी मंजुळा निवृत्ती खातळे(Manjula nivrutti khatle) पत्नी निवृत्ती खातळे(Nivrutti khatle) व त्यांची मुलगी भरविहीर गावाकडे जात असताना घोटी महामार्गालगत वाजे पेट्रोल पंपासमोर समाधान सोमनाथ झनकर व इतर साथीदारांनी खातळे यांची गाडी अडवली व मुलीला उचलून नेले. त्याच्या डोळ्यासमोरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्यानंतर खातळे दाम्पत्याने भगूर येथील नेवान शाळेच्या मागे, गोदान द्रुतगती मार्गासमोर जीवनयात्रा संपवली. Sinner Crime news

खळबळजनक व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी मुलीचा मामा दिगंबर भीमा शेळके(Digambar bhima shelake) यांच्या फिर्यादीवरून झनकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध सिन्नर पोलिसात(Sinner police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ व भरविहीर यांच्या नातेवाइकांनी खातळे दाम्पत्याचा मृतदेह ताब्यात घेऊन झनकर यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. या प्रकाराने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे.

हेही वाचा: Maharashtra SSC Result : मोठी बातमी! बारावीनंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, या दिवशी लागणार निकाल.

Comments are closed.