Last Updated on December 25, 2022 by Taluka Post
Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर(Sinner Dodi) : तालुक्यातील दोडी शिवारात शौचास गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घटना घडली. राजेंद्र बबन बर्डे (१७) असे मृत युवकाचे नाव आहे.
राजेंद्र हा पहाटे घराजवळील परिसरात शौचास गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध केली. मात्र, अंधार असल्याने त्याचा शोध लागला नाही. सकाळी राजेंद्रच्या बहिणीला गावातील प्राथमिक शाळेच्या आवारातील विहिरीमध्ये त्याची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसून आली. तिने याबाबत घरी नातेवाइकांना सांगितले असता त्यांनी तत्काळ सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.
अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी येत विहिरीत गळ टाकून राजेंद्रला बाहेर काढला. त्यास दोडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.