Last Updated on December 30, 2022 by Taluka Post
Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर(Sinner Duber) : तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या दहावीतील १९९६- ९७ सालच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शालेय आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्रित आले होते. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्यावर मेळाव्याची तयारी करण्यात आली. मेळाव्यास क्रीडा शिक्षक एस. एन. म्हाळणकर, शरद रत्नाकर, सी. एच. दातीर, जगन्नाथ कुन्हे, एस. डी. पवार, सी. पी. मोरे, मधुकर कणसे, बी. एम. वारुंगसे, के. डब्ल्यू सोनवणे, रामदास छल्लारे, मंगला छल्लारे, बी. एम. पवार, आर. के. लोहार, देशमुख, नंदिनी काजळे, दगू गीते, हरिश्चंद्र ताजनपुरे, एस. के. वारुंगसे आदी गुरुजन उपस्थित होते.
यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. युवा नेते उदय सांगळे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. गणेश जाधव, तुकाराम माळी, संदीप ढोली, चंदू कुंदे, नंदू शिंदे, सुभाष शिंदे, वसंत चव्हाण, किरण आव्हाड, मनीषा कानडे, वैशाली गोसावी, पल्लवी जगताप, संदीप पावसे, हेमंत वाघ, स्वप्निल देशमुख, प्रकाश वाजे, समीर शेख, सुयोग वाजे आदींसह ७५ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाचे अनुभव कथन केले, तुकाराम माळी,संदीप ढोली, मनीषा कानडे यांनी सूत्रसंचालन केले. अमेरिकेत असलेल्या नीलेश कणसे या माजी विद्यार्थी यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवून मनोगत व्यक्त केले,
माजी विद्यार्थी गणेश जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन व प्रत्येक शिक्षकाच्या आठवणी सांगितल्या. प्रमोद लोहार यानी गुरुमहिमा संतांच्या ओवीमधून सादर केला. चंद्रभान कुदे यांनी प्राथमिक शिक्षक ते माध्यमिक शिक्षकांनी कशा प्रकारे संस्कार दिले याची आठवण करून दिली. मित्र शम्मी यानी छान कव्वाली सादर करून देशभक्तीपर गीत गायले, वैशाली गोसावी हिने शाळेत असतानाच्या आठवणी सांगितल्या. आनंद शब्दात मावेनासा झाला,
हेही वाचा: Breaking News sinner : कोकाटे, हिरे, आहेर, दराडे बंधूंना धक्का