Last Updated on December 24, 2022 by Taluka Post
Sinner Dubere: सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील : जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रख्यात गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Sinner Dubere: कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर जाधव होते. व्यासपीठावर पर्यवेक्षक अशोक हिंगे, गणित विषयाचे ज्येष्ठ शिक्षक एकनाथ खैरनार, सोमनाथ पगार, डोंगरसिंग रबडे, बाळासाहेब वारुंगसे, कचेश्वर शिंदे, टी. के. बहिरम, सुषमा थोरात, डी. एच. जाधव, सोमनाथ गिरी, अरुण डावरे, रेखा खंडिझोड, अनंता पानसरे, शालेय पंतप्रधान आदित्य माळी, उपपंतप्रधान कोमल माळी आदींसह शालेय मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन(Srinivas Ramanujan) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यासह सर्व शिक्षकांनी गणित विषयाची प्रतिज्ञा घेतली. शिक्षक मनोगतात गणित समितीप्रमुख एकनाथ खैरनार यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य किशोर जाधव यांनी गणित दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन गणित हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. श्रीनिवास रामानुजन (Srinivas Ramanujan)यांचे गणित विषयासाठी खूप महत्त्वाचे योगदान आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करतो, असे सांगितले. जीवनातील गणित सोडविण्यासाठी गणित विषयाचा उपयोग होतो. प्रास्तविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी. आर. करपे(P.R.Karpe)यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक ए. बी. हिंगे(E.B..Hinge) यांनी मानले.
हेही वाचा: Sinner: बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुखपदी शिंदे