Last Updated on December 25, 2022 by Taluka Post
Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर(Sinner Gulvanch) : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने घोड्याचे शिंगरू ठार झाल्याची घटना घडली. गुळवंच शिवारात असलेल्या दगडवाडीत शुक्रवारी रात्री सदर घटना घडली. यात एक वर्षीय घोड्याच्या शिंगराचा बळी गेला.
दौलत बाबूराव गुरकुले यांची दगडवाडी शिवारात नाल्यालगत शेती आहे. शेतात चरण्यासाठी त्यांनी घरापासून काही अंतरावर एक वर्ष (1 Yers)वयाचे घोड्याचे शिंगरू बांधलेले होते. रात्री दहा वाजेच्या(10) सुमारास स्थानिक शेतकरी सोपान गुरुकुले हे त्यांच्या विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेजारच्या शेतात शिंगरू जखमी अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड करत दौलत गुरुकुले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली शिंगराचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. गेल्या काही दिवसापासून मादी बिबट्यासह बछड्यांचा या परिसरात वावर आहे
हेही वाचा: Sinner Dubere: डुबेरे येथे राष्ट्रीय गणितदिनी प्रतिमापूजन