Last Updated on January 3, 2023 by Taluka Post
Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद
(Sinner Igatpuri)इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सोमवारी (दि.२) सकाळी ८ सुमारास बिबट्याचे दर्शन घडले याची माहिती तत्काळ नवभा आल्यानंतर कळविण्यात वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात अडकवत जेरबंद केले. दरम्यान, सदर बिबट्या आठ ते नऊ वर्षांचा नऊ वर्षांचा असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले.
?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सोमवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या बाळा चौधरी, तानाजी चौधरी, तानाजी रायकर, रामदास चौधरी, रमेश वाघ, विठ्ठल मेंगाळ या बिबट्याचा नागरिकांना मुक्त संचार बघायला मिळाला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात गर्दी व्हायला सुरुवात झाली तर र परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांनी तत्काळ वनविभागाला या बिबट्याची खबर दिली.
वनविभागाने पकडण्यासाठी वन प्रक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वनरक्षकांच्या साह्याने बिबट्याला जाळ्यात पकडण्यात यश आले असून तो आजारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनरक्षक एफ. जे. सय्यद, मुज्जू शेख, सोमनाथ जाधव, सुरेखा गोहाडे, गोरख बागुल, स्वाती लोखंडे, कावेरी पाटील यासह वनरक्षकांनी प्रयत्न केले.
अजूनही बिबटे असण्याची शक्यता
या परिसरात अजूनही अनेक बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी नागरिकांशी संवाद साधत असताना रात्री दोन सोबत पाहिले असल्याचे स्थानिक मळ्यातील नागरिकांनी सांगितले. यामुळे वनविभागाने अजून पिंजयाची संख्या वाढवावी, असे नागरिकांनी सांगितले. यावेळी वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी राजेश पवार, विवेक भदाणे, केतन बिरासिस, वन परिमंडळ अधिकारी मधुकर चव्हाण, अरुण निबेकर, राजेंद्र इनामदार, वनरक्षक कैलास महाले, बबलू दिवे, रवी, संतोष बोडके, खंडू दळवी, शालिनी पवार, सुरेखा आव्हाड, कृष्णा चव्हाण, रवी मॉळे, सुखदेव तळवाडे उपस्थित होते.
बिबट्या हा आजारी असून तो आठ ते नऊ वर्षांचा आहे. त्याला न्यूमोनिया झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे त्याला तत्काळ नाशिक येथील गंगापूर रोडवरील रोपवाटिका येथे दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. तो बरा झाला की त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल.– केतन बिरारी, वन प्रक्षेत्र अधिकारी
हेही वाचा: Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट