Last Updated on January 3, 2023 by Taluka Post
Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर
Sinner industrial progress: पूर्वीपासूनच सिन्नरची ओळख विडी कारखान्याचे गाव म्हणून होती. भिकुसा यमासा क्षत्रिय विडी ही ‘सिन्नर विडी’ म्हणून राज्यभरात परिचित होती. इतरही विडी उद्योग सिन्नरमध्ये होते आणि आहेत. त्यांचे प्रमाण नगण्य आहे. सिन्नरमध्ये आणि परिसरातील गावांमध्ये या उद्योगाने लोकांना चांगला रोजगार मिळवून दिला. समुद्रसपाटीपासून २,१०० फूट उंचीवर वसलेल्या व घाट चढून याव्या लागणाऱ्या सिन्नरची पाणीटंचाई’ हीच ओळख. सहामाही शेती, शेतमजुरी आणि विड्या बांधून मिळणारा तुटपुंजा रोजगार.
?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
(Sinner industrial progress)या दुष्टचक्रात तालुका अडकलेला. मात्र, ऐशीच्या दशकात तालुक्याने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक तालुक्याच्या विकासाचा आलेख उंचावतच गेला आहे. सिन्नरचे सरासरी पर्जन्यमान कमी असले, तरी सर्व विभागांत झपाट्याने प्रगती होत असल्याने तालुक्याच्या विकासात मोठा हातभार लागत आहे.
(top industries in nashik) गेल्या १५-२० वर्षांपूर्वी मुंबई शिर्डी – औरंगाबाद – नागपूर या नव्या महामार्गाच्या निर्मितीमुळे औद्योगिकदृष्ट्या प्रगतिपथावरील औरंगाबाद शहर सिन्नरशी थेट जोडले गेले आहे. नाशिक पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने नाशिकच्या आधी पुणे चाकण उद्योगक्षेत्रात सिन्नरशी सहज संपर्क सुकर व गतिमान झाला. ओझर विमानतळ आणि शिर्डी विमानतळ गाठण्यासाठी सिन्नरमधून जवळचे रस्ते उपलब्ध होत असल्याने हवाईसेवाही टप्प्यात आली आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या उभारणीचे तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीचे दृढ संकेत देत आहेत.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी संकेत प्रकल्प म्हणून ओळखला गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते नागपूर टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. शिर्डी ते कल्याण भिवंडीपर्यंतचे काम येत्या सहा-सात महिन्यांत मार्गी लागेल. त्यानिमित्ताने ‘समृद्धी’ची आणखी एक हाक सिन्नरकरांच्या कानावर आली, असे म्हटले तर वावगे ठरू नये..
महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा ताळेबंद मांडताना पुणे – मुंबई आणि नाशिक या सुवर्णत्रिकोणाचे गणित नेहमीच मांडले जायचे. मात्र, नाशिकनगरीतील औद्योगिक विकासाला मर्यादा आल्यानंतर नजीकचे गाव म्हणून सिन्नरचा झपाट्याने औद्योगिक विकास झाला.
तत्कालीन आमदार सूर्यभान गडाख यांनी तालुक्याच्या प्रगतीची स्वप्ने पाहिली. पायाभूत सुविधा नसल्याचे कारण देत शासनाने नकारघंटा वाजविली. मात्र, शासनाच्या मदतीविना औद्योगिकीकरणाचा ध्यास घेऊन स्व. गडाख यांनी सहकारी तत्त्वावर औद्योगिक वसाहत स्थापन केली.(Sinner industrial progress) मुंबई, गुजरातमध्ये फिरून उद्योजकांचे मन वळविले. पाठोपाठ आमदार झालेल्या तुकाराम दिघोळे यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून माळेगाव येथे एमआयडीसीचे उद्योगक्षेत्र मंजूर करून घेतले. या दोन्हीही वसाहती प्रगत झाल्यानंतर गुळवंच व मुसळगाव येथे इंडियाबुल्स सेझ उभा राहिला.
(Saturday is nashik midc weekly off day) सेझमुळे होऊ घातलेले नवनवीन उद्योगव्यवसाय, रेल्वेमार्ग यामुळे सिन्नर तालुका खऱ्या अर्थाने परिस्थितीवर मात करू शकतील आणि सिन्नर विकासाच्या दिशेने अधिक वेग घेईल, अशी आशा आहे. मात्र, जागतिक मंदी आणि सरकारी धोरणाच्या गुंत्यात सेझचा पाय अडकला आहे. असे वाटते.(Sinner industrial progress) महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात तत्कालीन आमदार वसंतराव नाईक, शंकरबाबा नवले, शंकरशेठ वाजे, रुख्मिणीबाई वाजे यांनीही सिन्नरच्या विकासात्मक बदलांसाठी अनमोल योगदान दिले. उद्योग वसाहतीमुळे सिन्नर आणखी प्रकाशझोतात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने माळेगावच्या माळरानावर नंदनवन फुलवले. आजमितीला छोटे मोठे चारशेच्या आसपास उद्योग येथे सुरू आहेत. त्या माध्यमातून तालुक्यातील १५ ते २० हजार तरुणांच्या हातांना रोजगार मिळाला.
(sinnar midc company list) शासकीय औद्योगिक वसाहतीत जिंदाल सॉ पाइप लि(JINDAL SAW PIPE LTD)., केएसबी पंप्स लि(KSB pumps)., अॅडव्हान्स्ड एन्झाइम्स लि., एल अॅण्ड टी., मायलन, सीसीआय, भारत ग्लास, मार्वेल इंडस्ट्रिज, हिंदुस्तान युनिलिव्हर(Hindustan Unilever), एफडीसी लि. भगवती स्टील, भारत गॅस यासारखे उद्योग मैलाचा दगड ठरले.(nashik midc industries list) मध्यंतरीच्या काळात काही उद्योगांना घरघर लागली खरी, पण हे दिवसही निघून जातील, असे म्हणत कामगार मिळेल ते काम करीत राहिले. दुष्काळी तालुक्यातील बेरोजगार तरुणांना कामधंदा मिळाला हे अधिक महत्त्वाचे. उद्योगांमुळे सिन्नरमध्ये येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली. लहानसे सिन्नर गाव या सगळ्यांना सामावून घेण्यास अपुरे पडू लागले. त्यामुळे सिन्नरच्या कक्षा रुंदावत आहेत. जमिनींचे भाव वाढले. व्यापार उदीमची भरभराट झाली. हजारोंना रोजगाराच्या संधी मिळाल्या.(nashik industries list)
उद्योग क्षेत्रातले बांधकाम, नव्याने सुरू झालेले गृहप्रकल्प, उद्योग क्षेत्रात कामगार व अन्य जागांवर रोजगार यामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला. माळेगाव, सिन्नर शहरातील नवनवीन उपनगरे, कुंदेवाडी, मुसळगाव, गुळवंच सोबतच आसपासच्या गावांमध्येही रहिवासी क्षेत्र विस्तारले. शहरासोबत ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये विकासाचे वारे वाहात आहेत. नगर परिषदेची हद्दवाढ निवासी क्षेत्राच्या विस्तारास मिळालेली मंजुरी यामुळे नव्या शहरविकास आराखड्यात सिन्नरनगरीला शहराचे स्वरूप प्राप्त होत आहे. उंच उंच इमारती आणि सुखसुविधा असलेली निवासी नगरेही येथे वसू लागली आहेत.
‘औद्योगिकीकरणाबरोबर तालुक्यात सहकार, शेती, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांत विशेष प्रगती केली आहे. दूध उत्पादन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन अशा शेती जोडव्यवसायातही शेतकऱ्यांनी ठळक कामगिरी बजावली आहे. गावोगावी दूध संकलन केंद्रे उभी राहिली असून, तालुक्यातील दुग्धोत्पादनात भरीव स्वरूपाची वाढ झाली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सिन्नर तालुका दूध उत्पादक संघाचे तसेच माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गोंदेश्वर दूध उत्पादक संघाने संकलन केंद्रांचे जाळे विणल्याने शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसायाला चालना मिळाली आहे. अन्य सहकारी व खासगी केंद्राकडूनही संकलने होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. शेळी व मेंढीपालन तसेच कुक्कुटपालनातही शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
भाजीपाल्याच्या उत्पादनात तालुक्यातील ठाणगाव, पांढुर्ली परिसर, चास, नायगाव खोरे, दापूर, धुळवाड, चापडगाव, गोंदे यांसह अन्य भागांत पिकणारा भाजीपाला रोजच्या रोज गाड्या भरून नाशिक व मुंबईच्या बाजारपेठेत जातो. परप्रांतातील बाजारपेठांतदेखील या भाजीपाल्याने ओळख निर्माण केली आहे. भाजीपाला आणि कांद्याच्या उत्पादनात सिन्नरची ख्याती आहे. तालुक्याच्या पश्चिम व पूर्व भागात द्राक्षबाग, डाळिंबाच्या बागांच्या माध्यमाने निर्यातक्षम उत्पादन घेण्यात येते. शहासारख्या गावात शेवगा पिकाचा नवा पॅटर्न उभा राहिला आहे. औद्योगिक व शेतीविकास एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करत असल्याने शाश्वत समतोल विकासासाठी फलदायी ठरत आहे.