Last Updated on December 21, 2022 by Taluka Post
Sinner Kirtangali : विहिरीत बुडून बिबट्या मादी मृत ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
Sinner Kirtangali : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेली बिबट्याची मादी वनविभागाच्या प्रयत्नानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी १२ ला बाहेर काढण्यात आली.
गुळवंच येथील कैलास बाबूराव जाधव, भीमराव जाधव यांच्या मालकीच्या गट नंबर ५६१ मधील विहिरीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेली मादी बिबट्या विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडली. ही मादी साधारणत दीड ते दोन वर्षे वर्षाची आहे. शेजारीच शेतात मेंढ्या बसविण्यात आल्या होत्या. पाण्याचा आवाज झाल्याने मेंढपाळांनी पाहिले असता बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. त्यांनी लगेचच वनविभागास कळविले असता मध्यरात्र असल्याने कोणीही आले नाही.
सकाळी वनविभागाच्या वत्सला कांगणे, मधुकर शिंदे यांनी पाहणी केली. विहिरीत पाणी जास्त असल्याने बिबट्या मादी बुडाली होती. दोन दिवस पाणी उपसा केल्यानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी १२ वाजता बिबट्या विहिरीतून बाहेर काढून माळेगाव येथील वनोद्यानात पाठविण्यात आला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वत्सला कांगणे, मधुकर शिंदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Sinner solar power :सिन्नरच्या १७ गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प