Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
Sinner kokate : कोकाटे खरे बोलले?
Sinner kokate : लोकप्रतिनिधींना(People’s representatives) त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडून ते हक्काने सरकारकडून सोडवून घेण्याचे माध्यम म्हणजे विधीमंडळाचे अधिवेशन असते. सत्ताधारी असले तर विरोधी पक्षावर टीका करायची व विरोधी पक्षात असले तर सरकारला धारेवर धरण्याचे माध्यम म्हणूनही अधिवेशन महत्त्वाचे असते. एरव्ही लोकप्रतिनिधी असूनही सरकारी अधिकारी जुमानत नाहीत तर त्यांच्या विरुद्ध तक्रारी करण्याचे हक्काचे व्यासपीठ अधिवेशन असते. मात्र, या उलट सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे मत आहे.
आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता नको त्या गोष्टींवर चर्चा केली जाते. परिणामी, मतदार(Sinner kokate) संघातील प्रश्न तसेच पडून राहतात. त्यामुळे अधिवेशनात बसण्यापेक्षा मतदार संघात परतलेले बरे, असे मत कोकाटे यांचे असून, त्यामुळे ते सध्या सिन्नर मतदार संघात परतले आहेत. हेही वाच: Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी
त्यांच्या परतण्याने आता मतदार संघातील अन्य प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला, असे मानण्यास हरकत नसली तरी, नुकत्याच झालेल्या मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत(Sinner kokate) समर्थकाचा पराभव कसा झाला याचा आढावाही कोकाटे यांनी घेतल्याची चर्चा मतदार संघात होत आहे.