Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे

Last Updated on December 23, 2022 by Taluka Post

Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर(Sinner Manegaon) : तालुक्यातील मनेगाव परिसराची कमी दाबाने व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यातून कायमची सुटका करण्यासाठी मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागातील मनेगावसह धोंडवीरनगर, रामनगर, कुंदेवाडी, पाटोळे, आटकवडे, डुबेरे, डुबेरवाडी, लोणारवाडी, भाटवाडी व ढोकी यासर्व गावांतील शेती ग्राहक संख्या ३९५०, घरगुती ग्राहक संख्या ४९०० व औद्योगिक ग्राहक संख्या १५० अशा एकूण ९ हजार ग्राहकांना सिन्नर येथील १३२ केव्ही उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात असल्याचे आमदार कोकाटे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले.

हे उपकेंद्र या गावांपासून १५ ते २० किमीच्या परिघात असल्याने यातून होणारा वीजपुरवठा हा अतिशय कमी दाबाने होत असतो. शिवाय तो वारंवार खंडित होत असतो. त्यातून विद्युत उपकरणे जळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवार रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पिके वीजपुरवठ्याअभावी करपतात. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच इतर ग्राहकांनाही सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी मनेगाव येथील गट नं. ५०६ व ५०७ मध्ये वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी कोकाटे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत जागा उपलब्ध करणार

आमदार कोकाटे यांनी मागणी केलेल्या वीजउपकेंद्रास शेतकरीहित लक्षात घेऊन मनेगाव ग्रामपंचायत जागा देणार आहे. यासाठी ग्रामपंचायत मालकीचा गट नं. ५०७ व ५०७ मधील जागा देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने संमत केला आहे. अनेक ठिकाणी जागांअभावी सार्वजनिक कामे सुरू होऊ शकत नाहीत. मात्र काम मंजूर होण्यापूर्वीच जागा देण्यास संमती देण्यात आली.

हेही वाचा: Sinner Taluka: सिन्नर तालुक्यात वाजे गटाला 7, कोकाटे गटाला 3 जागा

Comments are closed.