Last Updated on December 22, 2022 by Taluka Post
Sinner Mendhi Accident: वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर : तालुक्यातील मेंढी शिवारात अज्ञात चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम भानुदास कापुरे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.शिवम आपली दुचाकी (क्र. एम. एच. १५ / जी. एच. ८४२२) ने सोमठाणे येथून मेंढीकडे येत असताना मेंढी शिवारातील सुकदेव गिते यांच्या वस्तीजवळ समोरून आलेल्या अज्ञात चारचाकीने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. त्यामुळे शिवम रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हातापायास व डोक्यास गंभीर दुखापत झाली.
स्थानिकांनी मदत करत त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड