Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी

Last Updated on December 28, 2022 by Taluka Post

Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजण्यापूर्वी आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुकीचा प्रस्ताव अनुक्रमे चार सदस्यीय व त्रिसदस्यीय करण्याचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारकडून आणणार असल्याचे समजते आहे. मात्र, होऊ घातलेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकात एक सदस्यीय प्रभाग पद्धत ही नागरिकांच्या हिताची असून तिचा अवलंब करावा. बहुसदस्यीय पद्धत ही घटनाबाह्य असून जुनीच एकसदस्यीय पद्धती अंमलात आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत केली आहे..

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे संबंधित विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या सदस्यांकडे जायचे असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, बहुसदस्यीय पद्धतीमुळे प्रलंबित विकासकामे करण्यात सदस्यांकडून टोलवाटोलवी होण्याची मोठी शक्यता आहे. शिवाय केलेल्या विकास कामांचे श्रेय व अपश्रेयाच्या मुद्दावरून राजकीय कलगीतुरा रंगू शकतो. एकसदस्यीय वॉर्ड पद्धत असल्यास नागरिक संबंधित नगरसेवकांकडे संपर्क साधून समस्यांचे निवारण करू शकतात. शिवाय भिन्न-भिन्न पक्षांचे नगरसेवक निवडून येत असल्याने निधी खर्च करण्यावरून खटके उडणार आहे, अशी भीती कोतवाल यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा

Comments are closed.