Last Updated on December 22, 2022 by Taluka Post
Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर (Sinner Principal Bhabad): आजूबाजूच्या वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये स्वतःहून प्राप्त करणे गरजेचे असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. भाबड यांनी व्यक्त केले.दोडी येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्याथी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत दोन दिवसीय महिला स्वसंरक्षण व प्रशिक्षण कार्यशाळेप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
महिलांनी संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने व खंबीरपणे तोंड देणे ही काळाची गरज आहे. महिलांनी जीवनात सहवास निवडताना दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींनी आपल्या परिसरातील विविध मानवी संकटांचा स्वसामर्थ्यावर विरोध करून आपल्या करिअरच्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्याचे आवाहन प्राध्यापिका एस. टी. भागवत यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर प्रा. नीलेश निकम, प्रा. सारिका शिंदे एस. के. बलक, आयडियल स्पोर्ट कराटे असोसिएशनचे भागवत बेलोटे, शीतल डावखर, श्वेतांबरी बेलोटे यांनी ‘महिलांचे स्वसंरक्षण व प्रशिक्षण’ यावर मार्गदर्शन केले; तर प्रशांत सानप, तृप्ती काकड, गणेश आव्हाड, संजय गायकवाड, रोहिणी डावखर यांनी विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देत विविध प्रात्यक्षिके सादर करीत महत्त्व विशद केले.
आर. डी. आव्हाड यांच्या हस्ते उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना निर्भय कन्या अभियानांतर्गत कार्यशाळेत सहभागाबद्दल प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या कार्यशाळेत एकूण २७० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. नीलेश वाकचौरे यांनी प्रास्ताविक, कल्पना घुगे यांनी सूत्रसंचालन केले; तर प्रा. बाबासाहेब कासार यांनी आभार मानले.
हेही वाचाच: Nashik Grampanchayat Election 2022: तुमच्या गावचा सरपंच कोण? कोणत्या पक्षाने मारली बाजी पहा एका क्लिक वर