सिन्नर: सिटी लिंक बसमध्ये दिव्यांगांना सवलत

Last Updated on December 3, 2022 by Taluka Post

सिन्नर : प्रहार दिव्यांग संघटनेकडून स्वागत, संचालकांना निवेदन
सिन्नर : गेल्या दोन महिन्यांपासून सिटी लिंक बस सेवा फक्त दिव्यांगांना शहरामधूनच बस सवलत मिळत होती. प्रहार दिव्यांग संघटनेने सिटी लिंकच्या व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देऊन ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटी लिंक बस सेवामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिटी बस व्यवस्थापकीय मंडळांनी ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटी लिंक बस प्रवासामध्ये दिव्यांगांना ७५ टक्के सवलत दिली आहे.

?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

ग्रामीण भागातील दिव्यांग १ डिसेंबरपासून सवलतीत प्रवास करू लागले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना बसमध्ये सवलत मिळण्यासाठी दोन महिन्यांपासून सिन्नर तालुका प्रहार संघटना प्रयत्न करीत होते. अखेर या प्रयत्नाला यश येऊन सिटी बस लिंक व्यवस्थापिका मंडळांनी ग्रामीण भागातील दिव्यांगांना ७५ टक्के सवलत जाहीर केली. प्रहार दिव्यांग संघटनेकडून या निर्णयाचे करून सिटी लिंक प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे, चंदू पवार, आनंद सातभाई, संदीप आव्हाड, सीमा बाकळे, पांडू आगळे, सुनील जगताप, वैभव वेलजळी, आदी उपस्थित होते.