सिन्नर : विज्ञान-गणित संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी गाडेकर यांची एकमताने निवड

Last Updated on December 3, 2022 by Taluka Post

सिन्नर तालुका विज्ञान-गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी गाडेकर तर कार्याध्यक्षपदी एस. टी. पांगारकर यांची निवड करण्यात आली.

इरा इंटरनॅशनल स्कूल येथे गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान प्रदर्शन सभा पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर. आर. महात्मे, डॉ. स्वाती भरि मयूर आव्हाड आदी उपस्थित होते. पांगारकर यांनी होऊ घातलेल्या सिन्नर तालुका विज्ञान प्रदर्शनाबद्दल माहिती सांगितली. मागील पाच वर्षांत कमी कामे झाल्याने नूतन कार्यकारिणी निवडण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले, विज्ञान प्रदर्शन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यानंतर आर. आर. महात्मे यांच्या हस्ते सिन्नर तालुका विज्ञान-गणित अध्यापक संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

नवीन कार्यकारिणीचा सत्कार गटशिक्षणाधिकारी साळुंखे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला नूतन कार्यकारिणी अध्यक्ष शिवाजी गाडेकर, उपाध्यक्ष लहानू शेळके, प्रीती पवार, कार्याध्यक्ष शिवनाथ पांगारकर, सहकार्याध्यक्ष विलास पवार, कार्यवाह सुदाम कराड, कोषाध्यक्ष – जमीर सय्यद, जिल्हा प्रतिनिधी- रवींद्र गिरी, सुनील पगार, मार्गदर्शक आर. आर. महात्मे, सदस्य परदेशी, आव्हाड, महाजन, गुरुळे, पाटील, महाले, सानप, अहिरराव भूषण, निशिगंधा सोनवणे, शीतल भसे, वरंदळ, वैशाली वाजे, धनवटे यांची निवड करण्यात आली.

सिन्नर तालुका विज्ञान-गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी गाडेकर तर कार्याध्यक्षपदी एस. टी. पांगारकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या सत्काराप्रसंगी मान्यवर.