Sinner solar power :सिन्नरच्या १७ गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.

Sinner solar power:महावितरणला पाच प्रस्ताव सादर; २ ते १० मेगावॉट क्षमता

सिन्नर : तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने २२८ गत शासकीय जमिनीची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात आता १७ गावांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प निर्माण होऊ शकतो. आता निष्कर्ष निघाला आहे. या गावातील सर्व ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती कागदपत्रे मागवून प्रस्ताव हा महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. त्यात आता सतरापैकी पाच गावांनी देखील प्रस्ताव सादर केले आहेत.

आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री सौर कृषी (Sinner solar power)वाहिनी योजनेअंतर्गत आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातले ३० टक्के कृषी वाहिन्या सौरऊर्जेवर आणण्याबाबतचे धोरण सरकारने निश्चित केले असून या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्याचे धोरण राबवले आहे. ज्या गावात गावठाण आणि कृषी वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशाच कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महावितरणला सरकारी जमिनीची पाहणी करण्याचे आदेश सुद्धा सरकारने दिले आहे.

दरम्यान जमीन खाचखळग्यांची, ओबडधोबड नसावी, ३३/११केव्हीए उपकेंद्रापासून ५ किमीपेक्षा कमी अंतर असावे, २ ते १० मेगावॉट निर्मिती एवढी क्षमता, पूर्णवेळ सूर्यप्रकाश मिळू शकेल, असे ठिकाण या निकषांवर सौरऊर्जा निर्मितीसाठी जागेची निवड करण्यात येत आहे.हेही वाचा: सिन्नर : प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका गरजेची

मनेगावसह १७ गावांत अनुकूलता दोडी बुद्रुक, दापूर, नळवाडी, कासारवाडी, वारेगाव, कोळगावमाळ,निमगाव- गुळवंच, केपानगर, हिवरगाव, वडांगळी, कहांडळवाडी, सायाळे, मोहरी, वडगाव-सिन्नर,मनेगाव, पाटोळे, पिंपळे याच गावांतील सरकारी जमिनी ह्या सौरऊर्जा निर्मिती प्रप्रकल्पासाठी(Sinner solar power) योगय आहे असे आढळून आले आहे.त्यामुळे सदरच्या सर्व ग्रामपंचायतीकडून विविध कागदपत्रे देखील मागवण्यात आली आहे.

महावितरणकडे कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात पुढील पैकी गावांचा समावेश आहे . जसे-मनेगाव, निमगाव- गुळवंच, पाटोळे, वडगाव – सिन्नर, पिंपळे आदी गावांनी आवश्यक ती कागदपत्रे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत . आणि ती कागदपत्रे जिल्हास्तरावर पाठवण्यात आली आहेत. उरलेल्या ग्रामपंचायतींना आठ दिवसांत त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.

Comments are closed.