सिन्नर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा;तरच ‘समृद्धी’चे उद्घाटन..!

Last Updated on December 5, 2022 by Jyoti S.

अधिकाऱ्यांना घेराव : समृद्धीबाधित शेतकरी आक्रमक

सिन्नर : समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडसह विविध समस्या अगोदर मार्गी लावा अन्यथा समृद्धी महामार्गाचे उद्घाटनच होऊ दिले जाणार नाही, असा इशारा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर शिवारात शेतकऱ्यांनी रविवारी (दि. ४) अधिकाऱ्यांच्या गाड्या महामार्गावर अडवत त्यांना घेराव घालून समस्यांचे निवेदन दिले.

समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या दरम्यानच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व सहव्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी दुशिंगपूर शिवारात एकत्र येत अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा व अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्गाने बाधित शेतकऱ्यांसह छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता सातपुते, उपअभियंता बोरसे यांची समृद्धी महामार्गावर वाहने अडवून त्यांना घेराव घालण्यात आला.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

समृद्धी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी निदर्शनास आणून देऊन समृद्धीच्या दोन्ही बाज सर्व्हिस रस्ता मिळावा तसेच समृद्धी कामासाठी शेतकऱ्यांच्या जागा घे माती, दगड, मुरूम काढण्यात आ त्या सर्वांचा मोबदला लवकर देण् यावा तसेच समृद्धीच्या कामा खराब झालेले सर्व रस्ते लव करण्याची मागणी पांगारकर शेतकऱ्यांनी केली.

अधिकारी वर्गाला घेराव घालून समृद्धी महामार्गावर ठिय्या मांडण्यात आला. यावर मार्ग निघाला नाही तर समृद्धी महामार्गचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा देण्यात आला. रस्ते विकास महामंडळाचे सातपुते यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी दुशिंगपूरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर, भाऊसाहेब शेंडगे, विजय शिंदे, सुभाष चासकर, दिलीप शिंदे, रामदास हाके, कचरु घोटेकर, भास्कर कहांडळ, नितीन अत्रे, रावसाहेब अत्रे, अशोक पावले, दत्ता पवार, भाऊसाहेब घोटेकर, ज्ञानेश्वर सरोदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Comments are closed.