Last Updated on December 21, 2022 by Taluka Post
Sinner Taluka: सिन्नर तालुक्यात वाजे गटाला 7, कोकाटे गटाला 3 जागा ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाने ठाणगाव, डुबेरेवाडी, वडगाव पिंगळा, सायाळे, लोणारवाडी व कारवाडी या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले; तर आ. माणिकराव कोकाटे यांच्या गटाने तर शहा, पाटपिंप्री, उजनी या तीन ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अनेकांना किरकोळ मतांनी पराभव सहन करावा लागला
लोकनियुक्त सरपंच : ठाणगाव- नामदेव शिंदे, नांदूरशिंगोटे- शोभा बर्के, वडगाव पिंगळा- शेवंताबाई मुठाळ, शहा- संभाजी जाधव, लोणारवाडी (शास्त्रीनगर ) – जयश्री लोणारे, डुबेरेवाडी (कृष्णनगर ) – दत्तू गोफणे, उजनी – निवृत्ती सापनर, पाटपिंप्री- नंदा गायकवाड, साराळे – विकास शेंडगे, आशापूर- सुलोचना पाटोळे, कारवाडी- रूपाली जाधव, कीर्तांगळी- कुसुम चव्हाणके.
हेही वाचा: Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या