Last Updated on January 7, 2023 by Taluka Post
Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन
सिन्नर (Sinner Taluka Leopards): तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. फुलेनगर (माळवाडी) येथील बिबट्या जेरबंद केल्यानंतर चौथ्या दिवशीच मिरगाव शिवारातही आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. गेल्या महिन्यापासून सदर बिबट्या मिरगाव शिवारात धुमाकूळ घालत होता.
अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत असल्याने रबी हंगामात शेतीला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. २ जानेवारी रोजी तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) येथे पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. गेल्या महिन्यापासून मिरगाव-पाथरे शिवारातील शिवरस्त्यावर बिबट्या अनेक शेतकऱ्यांना नजरेस पडत होता. मिरगाव शिवारातील ईशान्यश्वर परिसरात रात्रीच्या वेळी शेतीला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
वनविभागाने मिरगाव शिवारातील लक्ष्मण काशीनाथ नरोडे यांच्या शेत गट नंबर ३४२ मध्ये अगोदर द्राक्ष बागेशेजारी आणि त्यानंतर उसाच्या शेताजवळ पिंजरा लावला होता. गेल्या वीस दिवसापासून शेतकरी व वनविभागाला बिबट्या पिंजऱ्यात येण्याची प्रतीक्षा होती.शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नरोडे यांच्या शेतातील पिंजयात विबट्या जेरबंद झाला आणि त्याने हरकळ्यांनी परिसर दणाणून सोडला,
पाळीव प्राण्यांवर हल्ला
■ गेल्या महिन्यापासून मिरगाव शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली होती. अनेक शेतकऱ्यांना दिवसाही या बिबट्याचे दर्शन होत होते.
■ मिरगाव शिवारातील हिंगे यांच्या वासरासह व बकरीवर बिबट्याने हल्ला केला होता. या परिसरातील अनेक कुठेही विधाने फस्त केल्याचे शेतकयांनी सांगितले,
?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
आणखी एका बिबट्याचा वावर
■ मिरगाव शिवारात अनेक शेतकयांना विषयाची जोडी निदर्शनास आली आहे. वन- विभागाच्या पिंजयात एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी आणखीण एका बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे शेतकयांनी सागितले.
■ एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी आणखी एका बिबट्याची परिसरात दहशत असल्याने पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.