Saturday, February 24

Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट

Last Updated on December 28, 2022 by Taluka Post

Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

सिन्नर(Sinner Thangaon) : ठाणगाव येथील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील आयआयटी बॉम्बेच्या प्रांगणात भरलेल्या आंतरराष्ट्रीय टेक फेस्ट’ फेस्टिव्हलला नुकतीच भेट दिली.वर्षातून एकदा होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये आयआयटीच्या जगातील असंख्य देशातील विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध प्रकल्प सादर केले होते.

वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. इस्रोचे डायरेक्टर चंद्रशेखरन यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी संवाद साधला. आयआयटी मुंबईच्या ऐरोस्पेस डिपार्टमेंटचे विशाल कर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना आयआयटी विषयी माहिती सांगितली. जिद्द असेल तर अगदी दुर्गम खेड्यातील विद्यार्थी सुद्धा करिअर करू शकतो. फक्त स्वप्न हवेत व ते पूर्ण करण्यासाठी केवळ काही वर्षे कसून अभ्यास करण्याची तयारी हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ऐरोस्पेस डिपार्टमेंटचे एचओडी सुदर्शन कुमार, प्रा. सचिन सोनगे यांनीही मार्गदर्शन केले.

हेही वाचा: Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद

Comments are closed.