Last Updated on December 25, 2022 by Taluka Post
Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे लोकसहभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त सहभागाने ओढे, नाले यांमधून जे पाण्याचे प्रवाह चालू आहेत, ते अडवून बिगर पावसाळी हंगामासाठी पाण्याचा उपयोग होण्यासाठी तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
उजनी परिसरात आजही ओढे ना यांमधून काही प्रमाणात पाण्याचे प्रवाह चालू आहे. हे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्यासाठी कोंबडी खाद्याच्या रासायनिक खतांच्या किंवा सिमेंटच्या मोकळ्या झालेल्या बॅगमध्ये वाळू व माती भरून पाण्याचा प्रवाह अडविला जातो.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडविले जाते. या वनराई बंधारानिर्मितीवेळी ए. के. बागुल मंडळ कृषी अधिकारी, वावी, डी.आर. जोशी कृषी पर्यवेक्षक, वावी, एन. एस. खांडेकर कृषी सहायक उजणी व वनश्री राम सुरसे, बाजीराव वर्षे, बाळासाहेब महालखेडकर, राजेंद्र वर्पे, किसन वाघ, तुषार सरोदे, सुमन जगताप, सुनीता वर्षे उपस्थित होते.
सदर वनराई बंधायामुळे पाण्याचा साठा होऊन सदर पाणी परिसराती शुधन, पक्षी यांना पिण्यासाठी विना पाण्याची पातळी वाढण्यास निश्चित मदत होईल. राम सुरसे, शेतकरी, उजनी
हेही वाचा: Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे