Last Updated on December 25, 2022 by Taluka Post
Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
नांदूरशिंगोटे(Sinner Wavi Police) : सिन्नर तालुक्यात तसेच नाशिक शहर, अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला वावी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर अंधाराचा फायदा घेत दोघे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. सूरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहे.
वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र वाढल्याने सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिसांनी नांदूरशिंगोटे भागात रात्रीची गस्त वाढविली होती. याच वेळी कोते यांच्यासह पोलिस कर्मचारी भास्कर जाधव, रत्नाकर तांबे हे नांदूरशिंगोटे परिसरात गस्त घालत असताना नांदूरशिंगोटे गावात बायपास जवळ तीन इसम संशयितरीत्या फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांच्याजवळ जात त्यांची चौकशी सुरू केली असता त्यांनी पळ काढला. याच वेळी पोलिसांनी पाठलाग करत सूरज कापसे(Suraj Kapse) यास अटक केली.
यावेळी सूरज याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने जोडीदार तुषार गोरडे, निखिल वाल्हेकर यांच्या साथीने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही दुचाकी जप्त केल्या. चोरलेल्या दुचाकी या सराईत यांनी वाळूज आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतून चोरल्या आहेत. संशयित फरार झालेला तुषार गोरडे याच्यावर यापूर्वी आठ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा: Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले