‘खेलो इंडिया’ धोरणाचा ग्रामीण खेळाडूंना फायदा

Last Updated on December 3, 2022 by Jyoti S.

राधाकृष्ण विखे पाटील: सिन्नरला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

सिन्नर : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. शेजारी माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, जयवंत जाधव, शीतल सांगळे, पुंजाभाऊ सांगळे, गंगाथरन डी., कृष्णाजी भगत, श्री. राठी.

सिन्नर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’ हे नवीन क्रीडा धोरण आणले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ऑलम्पियाड स्पर्धेत भारतातील खेळाडूंना मोठ्या संख्येने पदके मिळाली. या क्रीडा धोरणाचा देशातील दुर्गम भागातील खेळाडूंना मोठा फायदा झाला असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राज्य व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, सिन्नर येथील सह्याद्री युवा मंच यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कबड्डी जिल्हा स्पर्धेचे व जिल्हास्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुरेश पदके माजी आमदार राजाभाऊ वाजे, उपसभ आयोजक उदय सांगळे, आमदार सानप सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्य माजी अध्यक्ष शितल सांगळे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार जयवंत मिळत माजी अध्यक्ष शितल सांगळे, कबड्डी मंच, तहसीलदार एकनाथ जाधव, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, खेळाडू सिन्नर शैलेश कुटे, प्रांताधिकारी अर्चना वांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मंत्री संचालक कृष्णाजी भगत, भारत कोकाटे, नारायण वाजे, भाजपचे संगी सुरेश वरंदळ, राजेश कपूर, माजी उपसभापती संग्राम कातकाडे, संजय , सानप उपस्थित होते.

श्री. विखे म्हणाले, की राष्ट्रीय कबड्डी व कुस्ती स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगली संधी मिळत आहे.खेळाकडे छंद म्हणून न पाहता खेळाडूंनी त्याकडे करिअर म्हणून पहावे असा सल्ला सांगळे यांनी दिला. माजी आमदार जयवंत जाधव यांनी खेळायला राज्यश्रय मिळाला पाहिजे पाहिजे,व खेळाडूंना न्याय मिळाला अशी आपली भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा