Dindori:’अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ चा जयघोष
Dindori: समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव; लाखोंनी केले श्रीगुरुचरित्र पारायदिंडोरी (Dindori): येथील केंद्रात सहभागी सेवेकरी, भाविक श्रीगुरुचरित्र अध्यायाचे वाचन करताना.नाशिक, ता. ७: दिंडोरी(Dindori) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री अण्णासाहेब मोरे स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ केंद्रामध्ये आज (ता.७) मंगलमय वातावरणात श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला.री १२.३९ मिनिटांच्या मुहूर्तावर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' असा जयघोष करत भाविकांनी जन्मोत्सव साजरा केला. आठवड्यापासून हजारो समर्थ केंद्रावर श्री. दत्त जयंती सप्ताहाची लगबग होती. या सप्ताहानिमित्ताने हजारो केंद्रात लाखो अबालवृद्ध सेवेकऱ्यांनी श्रीगुरुचरित्र पारायणासह विक्रमी सेवेत सहभाग नोंदवला. दुपारी १२.२७ मिनिटांनी श्रीगुरुचरित्रातील...