IPL 2023 CSK: लिलावानंतर धोनीचा संघ मजबूत झाला, स्टोक्स, रहाणेसह या खेळाडूंचा संघात समावेश
IPL 2023 CSK: लिलावानंतर धोनीचा संघ मजबूत झाला, स्टोक्स, रहाणेसह या खेळाडूंचा संघात समावेश ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
IPL 2023 CSK: IPL 2023 चा लिलाव आज कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये संपन्न झाला. या लिलावात अनेक खेळाडूंचे नशीब चमकले तर अनेक खेळाडूंची निराशा झाली. या लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) देखील जोरदार दिसत आहे.
या लिलावात सर्वात मोठी बोली इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी लागली होती. आयपीएलच्या 16व्या सीझनसाठी पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपये मोजून सॅम करणला आपल्या संघात समाविष्ट केले होते. बरं हा लिलावाचा विषय आहे, दुसरीकडे या लिलावात सीएसकेने बेन स्टोक्स आणि अजिंक्य रहाणेसारख्या खेळाडूंना विकत घेऊन चांगली समज दाखवली आहे.
यलो आर्मीचा बेन स्टोक्स
लिलाव संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग...