PM Modi speech: OBC बांधवांसाठी मोदींची मोठी घोषणा, जाणून घ्या काय आहे विश्वकर्मा योजना?
PM Modi speechनाशिक : देश आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज ध्वजारोहण केले. पंतप्रधानांनी ध्वजारोहण करण्याची ही 10वी वेळ आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तिथल्या सर्व लोकांवर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित केले आहे.अश्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलेले आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार, पुढील 1000 वर्षे, G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची संधी, महागाई यासह अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले आहे. त्यामुळेच यावेळी त्यांनी ओबीसी बांधवांसाठी विश्वकर्मा योजना राबवणार असल्याची मोठी घोषणा...