Hydrogen : खुशखबर!!!??राज्यात येणार हायड्रोजन वाहने
Hydrogen: 'ट्रिटॉन'च्या सीईओंनी घेतली शिंदे यांची भेटमुंबई, ता. ८. : हायड्रोजनवर(Hydrogen) चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकेतील ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्यात हायड्रोजनवर आधारित वाहनांचा प्रकल्प सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत याबाबतीत सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली आहेनाशिकसह राज्यातील ...