nashik ring road नाशिकमध्ये 2 बाह्य रिंगरोड होणार! 56 किलोमीटर लांबीच्या वर्तुळाकार रस्त्यावर 10 हजार कोटींचा खर्च, कसा असेल मार्ग? वाचा…
nashik ring road
नाशिक : नाशिक शहरात दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो सनातनी लोक नाशिक शहरात येतात. सनातन धर्मात कुंभमेळ्याला अलौकिक महत्त्व आहे. त्यामुळे नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.
आगामी कुंभमेळ्यासाठी शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक शहरात दोन आऊटर रिंगरोड विकसित करण्यात येणार आहेत. या दोन्ही रिंगरोडची लांबी सुमारे 56 किलोमीटर असणार असून या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.nashik ring road
या बाह्य रिंगरोडसाठी सुमारे 26 लाख 80 हजार चौरस मीटर म्हणजेच 268 हेक्टर जमीन संपादित करायची आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी भूसंपादनाबाबत महत्त्वा...