Nashik citylink news: खुशखबर! शहर बससेवेला कंटाळलेल्या नाशिककरांसाठी मोठी बातमी,सिटीलिंकला लवकरच मिळणार…
Nashik citylink news
नाशिक: महानगर परिवहन सेवेच्या सिटीलिंक कंपनीला वाहक पुरविण्यासाठी दुसरा कंत्राटदार नेमण्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदेतील अटी व शर्तीनुसार या निविदा प्रक्रियेत निवडलेल्या नागपुरातील पुरवठादाराने बयाणा रक्कम रु. उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल.
सिटीलिंकला सध्या फक्त एकच पुरवठादार वाहक पुरवत असून, त्या वाहकांना पगार न मिळाल्याने सिटीलिंक बससेवा सुरू झाल्यापासून वाहक सहा वेळा संपावर गेले आहेत. यामुळे वाहकांसाठी दोन पुरवठादार नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नाशिक महानगरपालिकेने जुलै 2021 मध्ये महानगर परिवहन महामंडळाअंतर्गत सिटीलिंक शहर बस सेवा सुरू केली. या सेवेसाठी वाहक पुरविण्यासाठी दोन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. एक कंत्राटदार 400 वाहक पुरवण्यापुरता मर्यादित असल्याने आणि वाहकांची प्रारंभिक संख्या 400 च्या आत असल्याने, एक...