Tag: shreee data janmoutsav

आज दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

आज दत्त जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : गोदातीरावरील श्री एकमुखी दत्तमंदिरासह शहरातील मंदिरात बुधवारी (ता. ७) सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा रंगणार आहे. सोहळ्यानिमित्त महाआरतीसह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ६) मंदिरात मूर्ती आगमन सोहळा रंगला. शहराच्या विविध परिसरातील श्रीदत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गंगाघाटावरील अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ नदीच्या उजव्या तटावर प्राचीन एकमुखी दत्तमंदिर असून, बर्वे कुटुंबीय चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे. देवस्थानतर्फे जन्मोत्सव महोत्सवानिमित्त 30 नोव्हेंबरपासून श्रीदत्त सप्ताहात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी आठ ते बारादरम्यान गुरुचरित्र व नवनाथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय रोज सायंकाळी ७ ते ९ या...