Sinner Mendhi Accident : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
Sinner Mendhi Accident: वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : तालुक्यातील मेंढी शिवारात अज्ञात चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम भानुदास कापुरे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.शिवम आपली दुचाकी (क्र. एम. एच. १५ / जी. एच. ८४२२) ने सोमठाणे येथून मेंढीकडे येत असताना मेंढी शिवारातील सुकदेव गिते यांच्या वस्तीजवळ समोरून आलेल्या अज्ञात चारचाकीने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. त्यामुळे शिवम रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हातापायास व डोक्यास गंभीर दुखापत झाली.स्थानिकांनी मदत करत त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचा: Sinner Princi...