Tag: sinner marathi news

Sinner news : विहिरीत पडलेल्या बिबट्या-मांजराचा खेळ, जीव वाचवण्यासाठी मांजराने घेतला बिबट्याच्या शेपटीचा आधार…
मनोरंजन: Entertainment, ताज्या बातम्या : Breaking News

Sinner news : विहिरीत पडलेल्या बिबट्या-मांजराचा खेळ, जीव वाचवण्यासाठी मांजराने घेतला बिबट्याच्या शेपटीचा आधार…

Sinner newsथोडं पण गमतीदार Sinner newsगंमतशीर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करासिन्नर तालुक्यातील(Sinner news) ठाणेगाव जवळील टेंभुरवाडी (आशापूर) येथे एकाच विहिरीत बिबट्या आणि मांजर पडलेले दिसले. भक्ष्याच्या शोधात मांजराचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. मात्र पाण्यात पडल्यानंतर मांजर जीव वाचवण्यासाठी बिबट्याच्या शेपटीचा आधार घेत असल्याचे दिसून आले.बिबट्या व मांजर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी तो कॅमेऱ्यात कैद केला असून तो आज व्हायरल होत आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.टेंभुरवाडी येथील गट क्रमांक १५८५ मध्ये अण्णासाहेब नारायण सांगळे यांची विहीर आहे. मंगळवारी (दि. 14) सांगले हे शेतातील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरी...
Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळती

Sinnar Nagar Parishad: सिन्नर नगर परिषदेच्या मुख्य जलवाहिनीला गळतीपश्चिम भागात मुख्य जलवाहिनी अनेकदा फुटण्याचे प्रकारसिन्नर(Sinnar Nagar Parishad) : कडवा धरणातून करण्यात •आलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास शुक्रवारी घडला. पहाटेच्या सुमारास विद्युत जलपंप बंद करण्यात आले. मात्र तोपर्यंत हजारों लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. त्यात शेतकऱ्यांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. कडवा धरणातून सिन्नर शहर व उपनगरांसाठी पाणीयोजना राबविण्यात आली आहे.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?या योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शिवडे शिवारात संजय बोऱ्हाडे यांच्या शेताजवळ एअर वॉलला गळती लागली. त्यामुळे बो-हाडे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात साचले. सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते उत्तम हारक यांनी पाणीपुरवठा अभियंता हेमलता दे...
Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन

Sinner Taluka Leopards: सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर,अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शनपाळीव प्राण्यांवर हल्लाआणखी एका बिबट्याचा वावरसिन्नर (Sinner Taluka Leopards): तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. फुलेनगर (माळवाडी) येथील बिबट्या जेरबंद केल्यानंतर चौथ्या दिवशीच मिरगाव शिवारातही आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. गेल्या महिन्यापासून सदर बिबट्या मिरगाव शिवारात धुमाकूळ घालत होता.अनेक गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत असल्याने रबी हंगामात शेतीला पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. २ जानेवारी रोजी तालुक्याच्या पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) येथे पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. गेल्या महिन्यापासून मिरगाव-पाथरे शिवारातील शिवरस्त्यावर बिबट्या अनेक शेतकऱ्यांना नजरेस पडत होता. मिरगाव शिवारातील ईशान्यश्वर परिसरात रात्र...
Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्स
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्स

?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?Manikrao Kokate Offers: माणिकराव कोकाटे यांना शिंदे-भाजपकडून ऑफर्सबंधूच्या राजकीय विरोधाचा परिणाम नाहीनाशिक(Manikrao Kokate Offers) : राज्यातील सध्याचे सरकार चाचपडते आहे. पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळ कार्यरत नाही. पहिली अडीच वर्षे कोरोनामुळे गेली. आता सरकार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आमदारकीच्या टर्मबाबत मी समाधानी नाही. या मनःस्थितीपर्यंत मी आलो आहे. मला शिंदे गटासह भाजपाकडूनही ऑफर्स आहेत परंतु आता पुन्हा पक्ष बदलायचा नाही, असा निश्चय केल्याचे सिन्नर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.कोकाटे म्हणाले आगामी लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवायची याबाबत निश्चित असा विचार केलेला नाही परंतु लढायचेच ठरवले तर विधानसभेला प्राधान्य असेल. लोकसभेची जागा...
Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखरSinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखरSinner industrial progress: पूर्वीपासूनच सिन्नरची ओळख विडी कारखान्याचे गाव म्हणून होती. भिकुसा यमासा क्षत्रिय विडी ही 'सिन्नर विडी' म्हणून राज्यभरात परिचित होती. इतरही विडी उद्योग सिन्नरमध्ये होते आणि आहेत. त्यांचे प्रमाण नगण्य आहे. सिन्नरमध्ये आणि परिसरातील गावांमध्ये या उद्योगाने लोकांना चांगला रोजगार मिळवून दिला. समुद्रसपाटीपासून २,१०० फूट उंचीवर वसलेल्या व घाट चढून याव्या लागणाऱ्या सिन्नरची पाणीटंचाई' हीच ओळख. सहामाही शेती, शेतमजुरी आणि विड्या बांधून मिळणारा तुटपुंजा रोजगार.?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?(Sinner industrial progress)या दुष्टचक्रात तालुका अडकलेला. मात्र, ऐशीच्या दशकात तालुक्याने ...
Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद

Sinner Igatpuri: सिन्नर, इगतपुरीसह त्र्यंबक तालुक्यात वनविभागाची कामगिरी; एकाच दिवशी तीन बिबटे जेरबंद(Sinner Igatpuri)इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील कपारेश्वर महादेव येथे डोंगराजवळ मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना सोमवारी (दि.२) सकाळी ८ सुमारास बिबट्याचे दर्शन घडले याची माहिती तत्काळ नवभा आल्यानंतर कळविण्यात वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याला जाळ्यात अडकवत जेरबंद केले. दरम्यान, सदर बिबट्या आठ ते नऊ वर्षांचा नऊ वर्षांचा असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले.?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सोमवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या बाळा चौधरी, तानाजी चौधरी, तानाजी रायकर, रामदास चौधरी, रमेश वाघ, विठ्ठल मेंगाळ या बिबट्याचा नागरिकांना मुक्त संचार बघायला मिळाला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात गर्दी व्हायला सुरुवात झाली तर र परिसर...
Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा

Sinner Duber: २५ वर्षांनंतर जमले माजी विद्यार्थी; आठवणींना उजाळा ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Duber) : तालुक्यातील डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या दहावीतील १९९६- ९७ सालच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शालेय आठवणींना उजाळा दिला. २५ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्रित आले होते. यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्यावर मेळाव्याची तयारी करण्यात आली. मेळाव्यास क्रीडा शिक्षक एस. एन. म्हाळणकर, शरद रत्नाकर, सी. एच. दातीर, जगन्नाथ कुन्हे, एस. डी. पवार, सी. पी. मोरे, मधुकर कणसे, बी. एम. वारुंगसे, के. डब्ल्यू सोनवणे, रामदास छल्लारे, मंगला छल्लारे, बी. एम. पवार, आर. के. लोहार, देशमुख, नंदिनी काजळे, दगू गीते, हरिश्चंद्र ताजनपुरे, एस. के. वारुंगसे आदी गुरुजन उपस्थ...
Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक

Sinner Sonewadi: विहिरीतील जलपंप चोरणाऱ्यास अटक ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Sonewadi) : तालुक्यातील सोनेवाडी येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीवरील जलपंप चोरीप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. केशव दौलत रावले (४५) यांची शेत गट नंबर ९८ मध्ये विहीर आहे. संशयित आरोपी भारत कडाळ (३२) यांनी दुपारच्या वेळी विहिरीतील तीन अश्वशक्तीचा जलपंप चोरून नेला. रावले यांनी वावी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी कडाळ यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर करत आहेत.हेही वाचा: Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू ...
Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी

Sinner Namdev Kotwal: एक सदस्यीय प्र. पद्धत लागू करावी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजण्यापूर्वी आगामी महापालिका व नगरपालिका निवडणुकीचा प्रस्ताव अनुक्रमे चार सदस्यीय व त्रिसदस्यीय करण्याचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारकडून आणणार असल्याचे समजते आहे. मात्र, होऊ घातलेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकात एक सदस्यीय प्रभाग पद्धत ही नागरिकांच्या हिताची असून तिचा अवलंब करावा. बहुसदस्यीय पद्धत ही घटनाबाह्य असून जुनीच एकसदस्यीय पद्धती अंमलात आणावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत केली आहे..बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे संबंधित विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणत्या सदस्यांकडे जायचे असा प्रश्न निर्माण ...
Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची ‘टेक फेस्ट’ला भेट

Sinner Thangaon: ठाणगावच्या विद्यार्थ्यांची 'टेक फेस्ट'ला भेट ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Thangaon) : ठाणगाव येथील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील आयआयटी बॉम्बेच्या प्रांगणात भरलेल्या आंतरराष्ट्रीय टेक फेस्ट' फेस्टिव्हलला नुकतीच भेट दिली.वर्षातून एकदा होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये आयआयटीच्या जगातील असंख्य देशातील विद्यार्थ्यांनी बनविलेले विविध प्रकल्प सादर केले होते.वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. इस्रोचे डायरेक्टर चंद्रशेखरन यांच्यासमवेत विद्यार्थ्यांनी संवाद साधला. आयआयटी मुंबईच्या ऐरोस्पेस डिपार्टमेंटचे विशाल कर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना आयआयटी विषयी माहिती सांगितली. जिद्द असेल तर अगदी दुर्गम खेड्यातील विद्यार्थी सुद्धा करिअर करू शकतो. फक्त स्वप्न हवेत व ते पूर्ण करण्यासाठी केवळ काही वर्षे कसून अभ्य...
Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Sinner Dodi: विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Dodi) : तालुक्यातील दोडी शिवारात शौचास गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घटना घडली. राजेंद्र बबन बर्डे (१७) असे मृत युवकाचे नाव आहे.राजेंद्र हा पहाटे घराजवळील परिसरात शौचास गेला होता. बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध केली. मात्र, अंधार असल्याने त्याचा शोध लागला नाही. सकाळी राजेंद्रच्या बहिणीला गावातील प्राथमिक शाळेच्या आवारातील विहिरीमध्ये त्याची चप्पल पाण्यावर तरंगताना दिसून आली. तिने याबाबत घरी नातेवाइकांना सांगितले असता त्यांनी तत्काळ सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली.अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी येत विहिरीत गळ टाकून राजेंद्रला बाहेर काढला. त्यास ...
Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार

Sinner Gulvanch: गुळवंच शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू ठार ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Gulvanch) : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात बिबट्याने हल्ला केल्याने घोड्याचे शिंगरू ठार झाल्याची घटना घडली. गुळवंच शिवारात असलेल्या दगडवाडीत शुक्रवारी रात्री सदर घटना घडली. यात एक वर्षीय घोड्याच्या शिंगराचा बळी गेला.दौलत बाबूराव गुरकुले यांची दगडवाडी शिवारात नाल्यालगत शेती आहे. शेतात चरण्यासाठी त्यांनी घरापासून काही अंतरावर एक वर्ष (1 Yers)वयाचे घोड्याचे शिंगरू बांधलेले होते. रात्री दहा वाजेच्या(10) सुमारास स्थानिक शेतकरी सोपान गुरुकुले हे त्यांच्या विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेजारच्या शेतात शिंगरू जखमी अवस्थेत असल्याचे दिसले. त्यांनी लागलीच आरडाओरड करत दौलत गुरुकुले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना...
Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा

Sinner Ujni: शेतकऱ्यांनी पारंपरिक साधनांचा उपयोग करून बांधला वनराई बंधारा ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे लोकसहभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त सहभागाने ओढे, नाले यांमधून जे पाण्याचे प्रवाह चालू आहेत, ते अडवून बिगर पावसाळी हंगामासाठी पाण्याचा उपयोग होण्यासाठी तीन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.उजनी परिसरात आजही ओढे ना यांमधून काही प्रमाणात पाण्याचे प्रवाह चालू आहे. हे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्यासाठी कोंबडी खाद्याच्या रासायनिक खतांच्या किंवा सिमेंटच्या मोकळ्या झालेल्या बॅगमध्ये वाळू व माती भरून पाण्याचा प्रवाह अडविला जातो.त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडविले जाते. या वनराई बंधारानिर्मितीवेळी ए. के. बागुल मंडळ कृषी अधिकारी, वावी, डी.आर. जोशी कृषी पर्यवेक्षक, वावी, एन....
Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद

Sinner Wavi Police: वावी पोलिसांकडून दुचाकी चोरटा जेरबंद ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?नांदूरशिंगोटे(Sinner Wavi Police) : सिन्नर तालुक्यात तसेच नाशिक शहर, अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला वावी पोलिसांनी जेरबंद केले आहे. तर अंधाराचा फायदा घेत दोघे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. सूरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहे.वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, चोऱ्यांचे सत्र वाढल्याने सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्यासह पोलिसांनी नांदूरशिंगोटे भागात रात्रीची गस्त वाढविली होती. याच वेळी कोते यांच्यासह पोलिस कर्मचारी भास्कर जाधव, रत्नाकर तांबे हे...
Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले

Sinner Cold: सिन्नर थंडीने गारठले ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Cold) / निन्हाळे : ऐन हिवाळ्यात गायब झालेली थंडी आता पुन्हा अवतरली आहे. या थंडीचा आता कडाका अचानक वाढल्याने सर्वांना हुडहुडी भरली आहे. घरात अडगळीत पडलेले उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. तसेच थंडीअभावी पिवळे पडत •असलेला गहू, हरभऱ्याचे पीक थंडीच्या कडाक्याने बहरल्याचे चित्र असून, रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीचे जोरदार आगमन झाल्याने हिवाळा जाणवू लागला आहे.अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामध्ये डिसेंबर महिना अर्धा महिना संपला. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवडे फारशी थंडी नव्हती. मात्र, या आठवड्यात सोमवारपासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. पहाटेच्या वेळी थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. हवामान खात्याने ही या आठवड्यात थंडी वाढणार असल्याची शक्यता...
Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी

Sinnar Nagar Parishad: दीनदयाल अंत्योदय योजनेतून लाभ,विविध योजनांतून १२ बचतगटांसह १८ वैयक्तिक व्यावसायिकांना कर्जमंजुरी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinnar Nagar Parishad) : कोरोनानंतर फेरीवाले व उद्योग व्यावसायिकांना कर्ज मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांतून १८ वैयक्तिक व्यावसायिकांसह १२ बचतगटांना कर्जमंजुरी देण्यात आली. सिन्नर नगर परिषद कार्यालयात दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी संजय केदार यांचे मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. त्यात सदर कर्जमंजुरी देण्यात आली.शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, बैंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक विश्वनाथ चक्रवर्ती, बँक ऑफ बडोदा शाखेचे व्यवस्थापक मंगेश कुलकर्णी, युनियन बँक आॅफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक अमोल अमृतकर आ...
Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे

Sinner Manegaon: मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची गरज : कोकाटे ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner Manegaon) : तालुक्यातील मनेगाव परिसराची कमी दाबाने व वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यातून कायमची सुटका करण्यासाठी मनेगाव येथे वीज उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागातील मनेगावसह धोंडवीरनगर, रामनगर, कुंदेवाडी, पाटोळे, आटकवडे, डुबेरे, डुबेरवाडी, लोणारवाडी, भाटवाडी व ढोकी यासर्व गावांतील शेती ग्राहक संख्या ३९५०, घरगुती ग्राहक संख्या ४९०० व औद्योगिक ग्राहक संख्या १५० अशा एकूण ९ हजार ग्राहकांना सिन्नर येथील १३२ केव्ही उपकेंद्रांतून वीजपुरवठा केला जात असल्याचे आमदार कोकाटे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दि...
Sinner Mendhi Accident : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Mendhi Accident : वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Sinner Mendhi Accident: वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : तालुक्यातील मेंढी शिवारात अज्ञात चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवम भानुदास कापुरे (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.शिवम आपली दुचाकी (क्र. एम. एच. १५ / जी. एच. ८४२२) ने सोमठाणे येथून मेंढीकडे येत असताना मेंढी शिवारातील सुकदेव गिते यांच्या वस्तीजवळ समोरून आलेल्या अज्ञात चारचाकीने त्याच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाला. त्यामुळे शिवम रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हातापायास व डोक्यास गंभीर दुखापत झाली.स्थानिकांनी मदत करत त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचा: Sinner Princi...
Sinner Principal Bhabad:  महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड

Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर (Sinner Principal Bhabad): आजूबाजूच्या वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये स्वतःहून प्राप्त करणे गरजेचे असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. भाबड यांनी व्यक्त केले.दोडी येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्याथी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'निर्भय कन्या अभियान' अंतर्गत दोन दिवसीय महिला स्वसंरक्षण व प्रशिक्षण कार्यशाळेप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.महिलांनी संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने व खंबीरपणे तोंड देणे ही काळाची गरज आहे. महिलांनी जीवनात सहवास निवडताना दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. मुलींनी...
Sinner Belu: बेलू येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Belu: बेलू येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

Sinner Belu: बेलू येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : तालुक्यातील बेलू (Sinner Belu)गावात बिबट्याने शेळीवर झडप घालून उसाच्या शेतात नेऊन फस्त केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. बेलू येथील रोशन एकनाथ वाघ (वय १७) हा दुपारी अडीचच्या सुमारास कडवा नदीजवळ शेळ्यांना पाणी पाजत होता.नदीच्या कडेला केशव जयराम तुपे यांचे गट नंबर ४६८ मध्ये दोन एकर उसाचे शेत आहे. याच उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळीवर हल्ला चढवला. दरम्यान जीव वाचवण्यासाठी शेळ्यांबरोबर असलेल्या रोशनने तेथून काही अंतरावर पळ काढला. यावेळी बिबट्याने शेळीची मान जबड्यात धरून तिला उसाच्या शेतात नेले. याबाबतची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर पांढुर्ली वन परि...
Sinner Kirtangali : कीर्तनगळी विहिरीत बुडून बिबट्या मादी मृत
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Kirtangali : कीर्तनगळी विहिरीत बुडून बिबट्या मादी मृत

Sinner Kirtangali : विहिरीत बुडून बिबट्या मादी मृत ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?Sinner Kirtangali : सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे दोन दिवसांपूर्वी विहिरीत पडून मृत्युमुखी पडलेली बिबट्याची मादी वनविभागाच्या प्रयत्नानंतर मंगळवारी (दि. २०) दुपारी १२ ला बाहेर काढण्यात आली.गुळवंच येथील कैलास बाबूराव जाधव, भीमराव जाधव यांच्या मालकीच्या गट नंबर ५६१ मधील विहिरीत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेली मादी बिबट्या विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीत पडली. ही मादी साधारणत दीड ते दोन वर्षे वर्षाची आहे. शेजारीच शेतात मेंढ्या बसविण्यात आल्या होत्या. पाण्याचा आवाज झाल्याने मेंढपाळांनी पाहिले असता बिबट्या विहिरीत पडलेला दिसला. त्यांनी लगेचच वनविभागास कळविले असता मध्यरात्र असल्याने कोणीही आले नाही.सकाळी वनविभागाच्या वत्सला क...
Sinner Taluka: सिन्नर तालुक्यात वाजे गटाला 7, कोकाटे गटाला 3 जागा
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Sinner Taluka: सिन्नर तालुक्यात वाजे गटाला 7, कोकाटे गटाला 3 जागा

Sinner Taluka: सिन्नर तालुक्यात वाजे गटाला 7, कोकाटे गटाला 3 जागा ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाने ठाणगाव, डुबेरेवाडी, वडगाव पिंगळा, सायाळे, लोणारवाडी व कारवाडी या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले; तर आ. माणिकराव कोकाटे यांच्या गटाने तर शहा, पाटपिंप्री, उजनी या तीन ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केली. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अनेकांना किरकोळ मतांनी पराभव सहन करावा लागलालोकनियुक्त सरपंच : ठाणगाव- नामदेव शिंदे, नांदूरशिंगोटे- शोभा बर्के, वडगाव पिंगळा- शेवंताबाई मुठाळ, शहा- संभाजी जाधव, लोणारवाडी (शास्त्रीनगर ) - जयश्री लोणारे, डुबेरेवाडी (कृष्णनगर ) - दत्तू गोफणे, उजनी - निवृत्ती सापनर, पाटपिंप्री- नंदा गायकवाड, साराळे - विकास...
Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News

Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या

Sinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्याSinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्याSinner Gonde: गोंदे येथे जि. प. शाळा येथे केंद्रातील शाळेंच्या विविध स्पर्धा भरवण्यात आल्या. त्या प्रसंगी सिमंतिनी ताई कोकाटे उपस्थित होत्या. शाळेच्या विविध अडचणी व मागण्यांवरही चर्चा झाली व सिमंतिनी ताई कोकाटे यांनी आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब ह्यांच्याशी देखील व्हिडीओ कॉल द्वारे संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याची माहिती करुन दिली.आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करासाहेबांनी देखील शाळेच्या नव्या इमारतीसाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. ह्या वेळी शाळेत लोक सहभागातून नवं वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या नवं वाचनालयाच...
Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश
क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश

Horizon Academy Sinner: सिन्नर येथील होरायझन स्कूलमधील विद्यार्थिसिन्नर ता. ११ क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील होरायझन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले.आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करासिन्नर येथील होरायझन(Horizon Academy Sinner) स्कूलमधील विद्यार्थिनानी विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ. निधी मिश्रा व शिक्षकवर्ग.Source :internetस्पर्धेत विद्यार्थिनी वैदिक गायकवाड (इयत्ता दहावी) हिने योगासनमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय पात्रता फेरी गाठली आहे. अनुष्का गोजरे (इयत्ता आठवी) हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. (Ho...
Sinner: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात मायलेक जागीच ठार
सिन्नर: Sinner, अपघात : Accident, ताज्या बातम्या : Breaking News

Sinner: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात मायलेक जागीच ठार

Sinner: सिन्नर-शिर्डी महामार्गावरील अपघातात मायलेक जागीच ठार ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर(Sinner) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकीला इनोव्हा कारने धडक दिल्याने नाशिकच्या मालेगाव स्टैंड भागातील हनुमानवाडी येथील मायलेक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. ११) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. वावी जवळील माळवाडी फाट्यानजीक हा अपघात झाला.मूळ वावी येथील रहिवासी असलेल्या व सध्या नाशिकला वास्तव्यास असलेले सुवर्णा अशोक कुलकर्णी (७०) व त्यांचा मुलगा वैभव अशोक कुलकर्णी (३६) यांची वावीजवळील माळवाडी (फुलेनगर) येथे शेतजमीन आहे. रविवारी सकाळी कुलकर्णी मायलेक आपल्या शाईन दुचाकी (क्र. एमएच १५ एचव्ही ७०८१) ने माळवाडी फुलेनगरकडे येत होते. माळवाडी फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा कार (क्र. एमएच ०८ एएन ३३८३) ने दुचाकीला धडक दिली.या अपघातात सु...
Sinner: सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात
सिन्नर: Sinner, अपघात : Accident, ताज्या बातम्या : Breaking News

Sinner: सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात

Sinner: सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात नाशिकच्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर काळाचा घाला महामार्गावर वाहतूक कोंडी ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर : नाशिक-सिन्नर महामार्गावर मोहदरी घाटात शुक्रवारी (दि.९) सायंकाळी वाजेच्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांत शिक्षण घेणात्या पाच विद्याथ्र्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.नाशिक येथील ८ विद्यार्थी स्विफ्ट कार क्र. एम. एच. ०३/ ए. आर. १६१५ मित्राच्या लग्नासाठी संगमनेर येथे गेले होते. परतताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचे टायर फुटले चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार वेट डिव्हायडर तोडून तीन ते चार वेळा उलटली. याचवेळी कार विरुद्ध दिशेच्या लेनवर आली....
सिन्नरचे सायकलपटू ‘एसआर’च्या दिशेने
सिन्नर: Sinner, ताज्या बातम्या : Breaking News

सिन्नरचे सायकलपटू ‘एसआर’च्या दिशेने

बीआरएम स्पर्धेचा तिसरा टप्पा १७ सायकलपटूंकडून पार ?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?सिन्नर: नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ४०० किलोमीटर बीआरएम स्पर्धेत सिन्नरच्या १७ सायकलपटू यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवीत वेळेपूर्वीच निर्धारित अंतर पार केले, स्पर्धेचा तिसरा टप्पा सिन्नरच्या सायकलपटू यांनी पूर्ण करत एसआर टायटलच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.नाशिक सायकलिस्टतर्फे ३ व ४ डिसेंबर रोजी ४०० किलोमीटर बीआरएम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बीआरएम ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेतली जाते. यात स्पर्धकांची मानसिक, शारीरिक क्षमतेचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी सायकलपटू ज्यांना संपूर्ण प्रवासात सायकल पंचर पासून ते सायकल रिपेरिंग चे कामे स्वतः करावी लागते. स्पर्धेत ४०० किमी टप्पा २७ तासांत पूर्ण करावा लागत असतो. यासाठी दिव...
सिन्नर: चंडियागासाठी सिन्नरला शेकडो भाविकांची उपस्थिती
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, सिन्नर: Sinner

सिन्नर: चंडियागासाठी सिन्नरला शेकडो भाविकांची उपस्थिती

सिन्नर, ता. ५ : शहरातील दिंडोरी प्रणीत श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात १ ते 8 डिसेंबर पर्यंत दत्त जयंती सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रविवारी चंडीयागासाठी केंद्रामध्ये सुमारे ६०० भाविकांनी उपस्थिती लावली.शहरातील स्वामी समर्थ आध्यात्मिक बाल संस्कार केंद्रात सप्ताह काळात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' च्या जयघोषात व स्वामी नामाच्या जयजयकारातसिन्नर सप्ताहानिमित्त सामुदायिक गुरुचरित्र पठण करण्यात असून त्यानंतर होम हवनाला सुरवात करण्यात येते.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?प्रत्येक दिवशी वेगवेगळे याग असून यामध्ये श्री गणेश याग, मनोबोध, चंडीयाग, स्वामी याग, मल्हारी याग होत असतात. या यागांसाठी सिन्नर शहरातील अनेक महिला व पुरुष यांची उपस्थिती ही लक्षणीय असते. रविवारी चंडी यागाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी गुरुचर...
सिन्नर: जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेत सदगीर, बिन्जर यांची बाजी
सिन्नर: Sinner, क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News

सिन्नर: जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेत सदगीर, बिन्जर यांची बाजी

सिन्नर: सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी व नाशिक जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात यापूर्वीचा राज्य केसरी विजेता हर्षल सदगीर हा मॅट प्रकारात, तर सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचा बाळासाहेब बिन्नर मातीतील कुस्ती स्पर्धेत अजिंक्य ठरले. त्यांची राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सिन्नर येथे कुस्ती स्पर्धेतील हर्षल सदगीर व बाळासाहेब बिन्नर या विजेत्यांना चांदीची गदा देऊन गौरव करताना पालकमंत्री दादा भुसे. समवेत शीतल सांगळे, जयवंत जाधव, पुंजाभाऊ सांगळे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उद्योगमंत्री उदय सामंत, उदय सांगळे आदी.?आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व आयुष विधे यांच्यात मॅट प्रकारात कुस्ती झाली. त्यात हर्षल अजिक्य ठरला. मातीच्या कुस्तीत बा...
सिन्नर : प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका गरजेची
सिन्नर: Sinner, क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News

सिन्नर : प्रत्येक तालुक्यात क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका गरजेची

पालकमंत्री भुसे सिन्नरला सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे लोकार्पणसिन्नर : सिन्नरला सह्याद्री युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी क्रीडा प्रबोधिनी व अभ्यासिकेसारखे आदर्श उपक्रम उभे राहिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारची क्रीडा प्रबोधिनी, अभ्यासिका उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. सह्याद्री युवा मंचचे संस्थापक उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून मैदानी व मॅटवरील विविध खेळांसाठी ही क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात आली आहे.उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आ. राजाभाऊ वाजे, कबड्डी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जयंत जाधव, युवा नेते सत्यजित तांबे, उद्योजक पुंजाभाऊ सांगळे, युवा नेते उदय सांगळे, जि. प. च्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, मविप्रचे माजी संचालक हेमंत वाजे, नामकर्ण आवारे, माजी उपस...