Last Updated on March 3, 2023 by Jyoti S.
Mobile laptop charging
थोडं पण महत्वाचं
Mobile laptop charging : हल्ली लोक दोन- दोन मोबाइल वापरतात. एकाचे चार्जिंग संपले तर काय करायचं? असा त्यांचा युक्तिवाद, अनेक जण चार्जिंग संपू नये यासाठी सोबत जाडजूड पॉवर बँक घेऊन फिरतात.
ऑफिस असो, हॉटेल असो वा घर, कुठेही पोहोचले की सर्वप्रथम मोबाइल चार्जिंग(Mobile laptop charging) पॉइंटकडे धावतात. सर्वांना चॅटरी १०० टक्के चार्ज हवी असते. पण हा अट्टाहास चुकीचा आहे. हे अनेकांना ठाऊक नसते. खरे तर त्यामुळे मोबाइलची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. हे टाळायचे असेल तर तुम्हाला ४०-८० चार्जिंगचा फॉर्म्युला माहीत असणे गरजेचे आहे.
हेही वाचा: School fee free : आर्थिक परिस्थिती बेताची ? तर पाल्याचा प्रवेश मोफत घ्या…
फॉर्म्युला नेमका काय?
मोबाइलचा वापर असा करावा की त्याचे चार्जिंग ४० टक्केपेक्षा कमी होऊ नये.
■ चार्जिंग करतानाही ही काळजी घ्यावी. बॅटरी ८० टक्क्यांपेक्षा अधिक होऊ नये.
वापर असा करावा की त्याचे पेक्षा कमी होऊ नये.
लॅपटॉप संदर्भात अधिक माहितीसाठी क्लिक करा
लॅपटॉपसाठी काय फॉर्म्युला?
मोबाइलप्रमाणेच लॅपटॉपही लिखियम बॅटरीचा वापर केलेला असतो. मोबाइलच्या बॅटरीपेक्षी ही बॅटरी आकाराने मोठी असली तरी चार्जिंगच्या बाबतीत ४०-८० हाथ फॉर्म्युला आदर्श आहे. लॅपटॉपची बॅटरी ९० ते १०० टक्के इतकी चार्ज करणे योग्य नसते. ४०-८० हा फॉर्म्युला पाळला तर लॅपटॉपची बॅटरी दीर्घकाळ टिकते.
न पाळल्यास काय नुकसान?
कोणत्याही मोबाइलच्या लिथियम-आयन चॅटरीचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. या बॅटरीचा पूर्ण क्षमतेने योग्य रीतीने वापर व्हायचा असेल, तर चार्जिंग नियमितपणे ४० ते ८० या रेजमध्येच असले पाहिजे. प्रत्येक वेळी १००% चार्ज केल्यास बॅटरी लवकर खराब होण्याची भीती असते.