Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

Last Updated on January 4, 2023 by Taluka Post

Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

अहमदनगर: जिल्ह्यात चोरी, दरोड्याचे सत्र सुरूच आहे, श्रद्धा आणि अस्था असलेली मंदिरेही सुरक्षित नसल्याचे वास्तव आहे. सरत्या वर्षात पाच मंदिरांत चोरी झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे देव तरी कुठे सुरक्षित आहे, असे म्हणण्याची वेळ आली असून, सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे.

नऊ मंदिरांत वर्षभरात चोरी

मागील वर्षात शहरासह जिल्ह्यातील पाच मंदिरांत चोया झालेल्या आहेत. यामध्ये उज्जैनीदेवी मंदिर, मळगंगादेवी मंदिर, नागेश्वर मंदिर, केडगाव येथील साई मंदिर व बालाजी मंदिर, अकोले तालुक्यातील कोतुळेश्वर मंदिर, दत्तमंदिर, गणपती मंदिर, स्वामी समर्थ बाल संस्कार वर्ग, पुणतांबा येथील कार्तिकस्वामी मंदिराचा समावेश आहे. या मंदिरातील दानपेटी उघडून त्यातील रोख रक्कम, तसेच सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले.

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

दीड लाखांहून अधिक मुद्देमाल लांबविला

मंदिरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, दानपेटीतील रोख रक्कम, भजनाचे साहित्य, ध्वनिक्षेपक आदी दीड लाखाहून अधिक मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

धार्मिक कार्यक्रमांतही चोरी

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अशा कार्यक्रमांना महिलांची उपस्थित असते. गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याच्या घटनाही शहरात घडत आहेत.अनेक मंदिरात ना सीसीटीव्ही ना सुरक्षारक्षक शहरासह जिल्ह्यातील अनेक मंदिरांत सीसीटीव्ही नाहीत, तसेच बहुतांश मंदिरांत सुरक्षारक्षकांचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा ठिकाणी चोरीचे प्रमाण अधिक असून, किमान एका सुरक्षा क्षकाची तरी नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.

मंदिर परिसरात चोरीच्या घटना

सण-उत्सव तसेच नववर्षानिमित्त शिर्डी, शिंगणापूर, वृद्धेश्वर आदी मंदिरांत मोठी गर्दी होते. गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

देवाचीही भीती राहिली नाही

धार्मिकस्थळांमध्ये श्रद्धेपोटी भाविक जात असतात. मनोभावे पूजा करून नतमस्तक होतात; परंतु नीतिमूल्ये पायदळी तुडवीत काही प्रवृत्ती मंदिरासारख्या पवित्र ठिकाणीही चोरी करण्याचे धाडस करतात. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक तर नाहीच; पण देवाचीही भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,

हेही वाचा: Cholesterol level: वयोमानानुसार तुमची कोलेस्ट्रॉल लेवल किती असली पाहिजे ?

Comments are closed.