Last Updated on December 22, 2022 by Taluka Post
Azamgarh Uttar Pradesh: जुगाड ! पट्ट्याने नॅनो कारला बनवले चक्क हेलिकॉप्टर?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
आझमगड: उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील एका कारपेंटरने नॅनो कारचे रूपांतर हेलिकॉप्टरप्रमाणे दिसणाऱ्या अनोख्या कारमध्ये केले आहे. हवेत उडणारे नसले तरी रस्त्यावर धावताना हे हेलिकॉप्टर प्रवाशांना विमान प्रवासाचा अनुभव देऊ शकते, असे हे बनवणाऱ्या सलमानने सांगितले.
त्याने या नॅनो हेलिकॉप्टरचे नाव ‘सलमान हेलिकॉप्टर रथ’ असे ठेवले असून त्यावर आपला मोबाईल क्रमांक आणि पत्ताही छापला आहे. हे बनविण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागला आणि ३ लाख रुपये खर्च आला. रस्त्यावर धावणारे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. “सरकार आणि कंपन्यांनी मदत केली तर हवा आणि पाण्यावर चालणारे हेलिकॉप्टरदेखील बनवू शकतो” असेही सलमानने सांगितले.
हेही वाचा: Snake: समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात