Cars : ‘या’ गाड्यांचे ग्राहक झाले फुल फॅन, जाणून घ्या 2022 मधील बेस्ट-5 कार बद्दल..

Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.

Cars : ‘या’ गाड्यांचे ग्राहक झाले फुल फॅन, जाणून घ्या 2022 मधील बेस्ट-5 कार बद्दल..

भारतीय बाजारपेठेमध्ये 2022 या चालू वर्षात अनेक दिग्गज कंपन्यांच्या कार्स दाखल झाल्या पण यामध्ये काही कंपन्यांच्या कार्स मात्र विक्रीमध्ये आणि प्रसिद्धीमध्येही आघाडीवर आल्या आहेत. कोरोना व्हायरस आणि सेमी कंडक्टर चर्चा तुटवड्यामुळे यंदा ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला तरी या ग्राहकांच्या पसंतीनुसार या वर्षामधील टॉप-5 कार्सबद्दल(Cars) जाणून घ्या..

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

Tata Tiago EV(Cars ): भारतातील टाटा मोटर्सने नवीन नेक्सॉन ईव्हीला लॉंच करून ऑटो सेक्टरमध्ये भारताचे नाव हे एक नंबर वर आणले आहे. ही ईव्ही म्हणजे भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. तिची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये असून ही सिंगल चार्जमध्ये 300 किमी अंतर पार करू शकते, असं कंपनी सांगते.हेही वाचा: अबब!!!!!!! 20 कोटीची महागडी गाडी तुम्ही बघितली का?

Maruti Suzuki Grand Vitara(Cars): मारुती सुझुकीने आता चालू वर्षात या मिड-साइज एसयूव्हीला लॉंच केलं होतं. हे सेल्फ चार्जिंग हायब्रिड वाहन जर तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर ही एसयूव्ही स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंट पर्याय तुम्हाला देखील आवडू शकते. आणि तेसच इतर लोक ग्रँड व्हिटारा AWD प्रकार घेऊ शकतात.हेही वाचा: Cheap Bike: फक्त 20 हजार रुपयांत खरेदी करा ‘ही’ बाईक, वाचा जबरदस्त ऑफर..

Mahindra Scorpio-N(Cars): या वर्षात सर्वात सुरक्षित आणि ग्राहकांचा जोरात प्रतिसाद या गाडीला मिळाला आहे. महिंद्राने ज्या पॉवरफुल गाड्या लॉंच केल्यात त्यापैकी ही एक गाडी आहे. या एसयूव्हीची किंमत जवळपास 12 लाख रुपयांपर्यंत आहे. आणि आता या गाडीचे नवीन व्हर्जन लवकरच लाँच होणार आहे.

Mahindra XUV300 TurboSport(Cars): सध्याच्या आपल्या चालू वर्षामध्ये महिंद्राने एक्सयूव्ही 300 टर्बोस्पोर्टला सुद्धा लॉंच केले होते. यामध्ये 1.2 लीटर इंजिन देण्यात आले असून, हे 129बीएचपी पॉवर जनरेट करत असते. या कारची किंमत अंदाजे 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

Kia EV6(Cars): किया मोटर्सने अल्पावधीत आपल्या अनेक वाहनांचे उत्पादन करून विक्रीत चांगला हिस्सा दाखवला. ग्राहकांची पसंती मिळालेल्या 2022 मधील टॉप 10 कारमध्ये किया ईव्ही-6 या कारचा समावेश होतो आहे. ही कार फक्त 5.2 सेकंदामध्ये 0 ते 100 किमी इतका वेग पकडू शकते. एकदा हि कार फुल चार्ज केली की जास्तीत जास्त 700 किमी अंतर पार करू शकते, असा कंपनीने दावा केला आहे.