Last Updated on December 19, 2022 by Jyoti S.
Nokia :‘नोकिया’चा बजेट स्मार्टफोन लाॅंच, एका चार्जमध्ये तीन दिवस चालणार बॅटरी…
खूप चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोकियाने पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली पावले रोवण्यास सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य सर्व ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून नोकीयाने आताच नवीन बजेट स्मार्टफोन लाॅंच केलाय..
‘नोकिया(Nokia) C31’ असं या माॅडेलचे नाव असून, कंपनीने दोन प्रकारात तो बाजारात आणलाय. या स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

‘नोकिया(Nokia) C31’ची वैशिष्ट्ये
3GB रॅम व 32GB स्टोरेज- 9,999 रुपये
4GB रॅम, 64GB स्टोरेज- 10,999 रुपये
डिस्प्ले – 6.7 इंच HD
फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
बॅटरी- 5050mAh, एका चार्जमध्ये 3 दिवस चालणार
सुरक्षेसाठी फेस अनलॉक, फिंगर प्रिन्ट सेन्सर
चारकोल, मिंट व सायन कलरमध्ये उपलब्ध
हेही वाचा: Movie : ‘अवतार 2’ चित्रपटाशी संबंधित या 7 रंजक गोष्टी जाणून तुम्ही थक्क व्हाल.
बाजारात हा स्मार्टफोन विक्रीसाठी कधी येणार, हे कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र, नोकियाची वेबसाइट व रिटेल स्टोअर्सवर खरेदी करता येणार आहे.