
Last Updated on November 23, 2022 by Taluka Post
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बैठकीत चर्चा
मुंबई : आता पदवीसाठी तीन वर्षे नाही तर चार वर्षे लागणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पीएचडी नियमांमध्येही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येणार आहेत. यूजीसीने या संदर्भात घेतलेल्या बैठकीत या सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली.
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरू शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला आहे. पदवी अभ्यासक्रम हा 3 किंवा 4 वर्षांचा असेल. जर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला तर एफवाय अप पात्रताधारक विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किंवा थेट पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल. हा नवा अभ्यासक्रम तयार करताना विद्याथ्र्यांना मल्टी एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट असणार आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्यांने चार वर्षे • अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि त्या विद्यार्थ्याने हा अभ्यासक्रम • मध्येच सोडून दिला तर त्या विद्यार्थ्याला सोडलेल्या वर्षापासून पुन्हा या अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकेल. त्यानंतर तो विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो.
या अभ्यासक्रमात सेमिस्टर एक ते तीन हे शिक्षणाच्या सर्व प्रमुख क्षेत्रांची समज विकसित करण्यासाठी असतील. सेमिस्टर चार ते सहामध्ये स्पेशलायझेशनसाठी किंवा आंतरविद्याशाखीय क्षेत्र निवडण्यासाठी आहेत. शेवटच्या दोन सत्रांमध्ये विद्यार्थी संशोधन प्रकल्प हाती घेतील.
प्रवेश घेतल्यानंतर दोन सेमिस्टर पूर्ण केल्यास ‘त्या’ अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिले जाणार
चार सेमिस्टर म्हणजे दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदविका पूर्ण होईल
सहा सेमिस्टर म्हणजे तीन वर्षे पूर्ण केल्यास पदवी मिळेल. तो विद्यार्थी पूर्वीप्रमाणे दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल
आठ सेमिस्टर म्हणजे चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी एक वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी प्रवेशासाठी पात्र असेल
या चर्चेनंतर यूजीसी याबाबतच्या सूचना आणि अभिप्राय लोकांमधून मागवण्याची शक्यता आहे
पीएचडीसाठी कमाल कालावधी सहा वर्षांचा निर्धारित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्षाच्या एकूण रिक्त जागांपैकी ६० टक्के जागा एनईटी/जीआरएफ पात्र विद्यार्थ्यांमधून भरल्या जातील आणि उर्वरित ४० टक्के जागा मुलाखतीच्या आधारे विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेच्या पात्र विद्यार्थ्यांमधून भरल्या जातील
मराठी बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा
