Gram Panchayat: ऐकावं तेवढं नवलचं, बघा ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभार!!

Last Updated on January 6, 2023 by Jyoti S.

Gram Panchayat: जन्मदाखल्याऐवजी दिला हयात मुलाचा मृत्यूचा दाखला !

करंजाळी : शासकीय कामकाजाबद्दल नेहमीच नाके मुरडली जातात. ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी संभावनाही केली जाते. शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकूणच मानसिकतेबद्दल समाजमाध्यमांवरही अनेक किस्से पाहायला ऐकायला मिळतात. त्याचाच दाहक प्रत्यय कसबे वणी ( ता. दिंडोरी) येथील एका मुलाच्या पित्याला आला आहे.

चंडिकापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने संबंधित पालकाच्या पाल्याचा जन्मदाखला देण्याऐवजी त्यांच्या हातावर चक्क मत्यचा दाखला. सोपविल्याने पालकाला भोवळ यायची बाकी राहिली होती. आता या प्रकरणामुळे व्यथित झालेल्या पालकाने गटविकास अधिकाऱ्यांकडे. ग्रामसेवकाबद्दल तक्रार केली आहे. कसबे वणी ( ता. दिंडोरी) येथील रियाज अमीनखान मुल्ला यांचा मुलगा अली रियाज खान याचा जन्म दि. १. जुलै २००५ रोजी चंडिकापूर (पा. भातोसे, ता. दिंडोरी) येथे झाला. त्यानुसार त्यांनी त्याच वेळी चंडिकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात मुलाच्या जन्माची नोंद केली होती.

?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

माझ्या मुलगा अली खान हा हयात असूनदेखील तो सध्या वणी येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. मी त्याचा जन्मदाखला मागितला असून, त्यांनी मला माझ्या मुलाचा मृत्युदाखला दिला. याबाबत मी गटविकास अधिकारी मेढे यांच्याकडे तक्रार केली आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.रियाज अमीनखान मुल्ला, तक्रारदार

चंडिकापूर येथील ग्रामसेविका यांच्याविरोधात रियाज अमीनखान मुल्ला यांची लेखी तक्रार आली असून त्यांचा मुलगा हयात असूनदेखील त्याचा मृत्यूचा दाखला देण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. संबंधित ग्रामसेविका यांना नियमाने नोटीस काढण्यास सांगितलेली आहे. त्या नोटिसीचा लेखी खुलासा आल्यानंतर कायदेशीर कारवाई होण्यासाठी तो अहवाल पाठविण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल. विनोद मेढे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, दिंडोरी

कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, ग्रामसेवकांनी दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी त्यांच्या सही व निबंधकाचा शिक्का असलेला दाखला दिला. मात्र हा दाखला जन्माचा देण्याऐवजी चक्क मुल्ला यांच्या हाती मुलाच्या मृत्यूचा दाखला सुपुर्द करण्यात आला. त्यात मुलाच्या मृत्यूची नोंद दि. १ जुलै २००५ अशा तारखेने केली आहे. वास्तविक मुल्ला यांचा मुलगा हा हयात असून, सध्या तो वणी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मागितला होता जन्मदाखला मिळाला मृत्यूचा दाखला त्यामुळे मनस्ताप झालेल्या मुल्ला यांनी संबंधित ग्रामसेवकावर आरोप करत दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मेढे यांच्याकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा: Harihar Fort: हरिहर किल्ल्यावरील दुर्घटनांवर नियंत्रण