Spots on the sun: सौर वादळामुळे सूर्यावर डाग

Last Updated on January 8, 2023 by Taluka Post

Spots on the sun: सौर वादळामुळे सूर्यावर डाग

जळगाव(Spots on the sun) : सौर मंडळातील घडामोडींमुळे अचानक सूर्यावरील डागांची संख्या वाढली आहे. यामुळे चुंबकीय सौर वादळाची निर्मिती होऊन झोत सूर्याच्या वातावरणातून संपूर्ण सौर मंडळाकडे फेकला जात आहे.

येत्या काही दिवसांत हा चुंबकीय लहरींचा झोत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पृथ्वीवरील दळणवळणावर परिणाम होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तविली आहे. जळगाव येथील खगोल अभ्यासक सतीश पाटील २५ वर्षांपासून निरीक्षण करीत आहेत. शनिवारी सकाळी त्यांना सूर्यावरील डागांची संख्या वाढलेली दिसली.(Spots on the sun) त्यातून सौरज्वाला व सौरउद्रेक पाहायला मिळाला.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? तसेच कारंज्याप्रमाणे सौर द्रव्यदेखील आकाशात उडत असून पुन्हा सौर पृष्ठभागावर आदळत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे.

सौर वादळामुळे सूर्यावर डाग

२०१३ नंतर वादळाची स्थिती

साधारणपणे प्रत्येक ११ वर्षांनी अशा वादळाची स्थिती निर्माण होत असते. सन १९८०, १९९० व ऑगस्ट २०१३ मध्ये अशी स्थिती उद्भवली होती. त्यावेळी सूर्यावर ६९ डाग आढळून ‘आले होते.

न्यूक्लिअर फ्युजनमुळे होते अशी परिस्थिती

न्युक्लिअर फ्युजनद्वारे सुर्यावर ऊर्जा निर्माण होते. सूर्याच्या उर्जेचा मुख्य स्रोत हायड्रोजन वायू आहे. हायड्रोजनच्या दोन अणूचे केंद्रकीय एकीकरण होऊन हेलियमचा एक रेणू तयार होतो. अणुस्फोटाच्या नेमकी विरोधी ही स्थिती असते.

हेही वाचा: Gram Panchayat: ऐकावं तेवढं नवलचं, बघा ग्रामपंचायतीचा अजब गजब कारभार!!