Last Updated on January 1, 2023 by Jyoti S.
Stunt viral video : धावत्या दुचाकीवर अशोभनीय स्टंटबाजी जोडप्याला भोवली
धावत्या दुचाकीवर अशोभनीय स्टंटबाजी(Stunt viral video) करणे एका प्रेमी युगुलाला भोवले. दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसून एक तरुणी प्रियकराला मिठी मारत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली.
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे स्टील प्लांट मार्गावर हा प्रकार सुरु होता. दुचाकीच्या मागून जाणाऱ्या एका कारमधून कोणीतरी व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर लगेचच व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी पोलिसांना टॅग करून लक्ष वेधले.
पोलिसांनी लगेचच कारवाई करत गुरुवारी उशिरा के. शैलजा (१९) आणि अजय कुमार (२२) यांना अटक केली. दोघांविरुद्ध निष्काळजीपणाने वाहन चालविण्याच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दुचाकीही जप्त केली आहे.
त्यांच्या पालकांनाही समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. अशी स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, कारण ते स्वतःसोबतच इतरांचा जीवही धोक्यात घालतात, असे मत नेटकरी व्यक्त करत आहेत.