सर्वात लांब नाक असलेली व्यक्ती

Last Updated on November 23, 2022 by Jyoti S.

लंडन : जगात अशा अनेक व्यक्ती असतात की ज्या काही ना काही शारीरिक व्यंगामुळे असे लोक सामान्य लोकांसारखे जीवन जगू शकत नाहीत. पण कधी कधी हे व्यंगच त्यांना जगप्रसिद्ध करून सोडते. असाच किस्सा जगातील सर्वात लांब नाक असलेल्या व्यक्तीचा. याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे. त्याचा हा विक्रम मागील सुमारे अडीचशे वर्षांमध्ये कोणीही मोडू शकलेला नाही.

या व्यक्तीचे नाव थॉमस वेडर्स असे आहे. थॉमस वॅडहाऊस या नावानेही ते जगप्रसिद्ध आहेत. थॉमस यांचे नाक तब्बल 7.5 इंच लांबीचे होते. सन 1770 मध्ये थॉमस इंग्लंडमध्ये एका सर्कशीमध्ये जोकर म्हणून काम करत होते.

आता चर्चेत का आले थॉमस?

longest nose2 Taluka Post | Marathi News

एवढ्या वर्षांनंतर थॉमस वेडर्स पुन्हा चर्चेत येण्याचे कारण आहे सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला एक फोटो. हा फोटो आहे म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या मेणाच्या पुतळ्याचा. हा पुतळा थॉमस यांचा आहे. या फोटोला आतापर्यंत सव्वा लाखांहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तर सात हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्विट करण्यात आला आहे. हेही वाचा :फॅशनने मर्यादा ओलांडली आहे, अशा पँट्स पाहून तुम्ही तुमचा चेहरा लपवाल