Diabetes health tips : मधुमेहाच्या रुग्णाने नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या साखर वाढेल की कमी होईल

Last Updated on May 21, 2023 by Jyoti S.

नारळ पाणी(Diabetes health tips) : अनेकांना प्रश्न पडतो की मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? मधुमेहाच्या रुग्णांनी गोड खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने त्याचे सेवन मधुमेहात शक्य आहे का, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

सकाळी सकाळी नारळ पाणी पिण्याचा सल्ला हा दिला जात असतो . कारण नारळ पाणी आरोग्यासाठी चांगले असते. काही लोकांना नारळ पाणी पिण्याची शौकीन असते. विशेषतः म्हणजे जेव्हा लोक सुट्टीसाठी समुद्रकिनारी जातात तेव्हा त्या नारळाच्या पाण्याची चव हि वेगळीच अनुभूती आपल्याला देते. हे अतिशय आरोग्यदायी(Diabetes health tips) पेय मानले जाते, त्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे अनेक वेळा मधुमेहींना गोंधळ होतो की ते हे नैसर्गिक पेय पिऊ शकतात की नाही? नारळ पाण्याच्या सेवनाने आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल की नाही असे आपल्याला नेहमी वाटत असते? हा त्याच्या मनाला पडलेला प्रश्न. आता हा भ्रम दूर करा.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. नारळ पाणी हे आरोग्यदायी आहाराचा एक महत्वाचा भाग आहे, त्यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात, त्यामुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलची(Diabetes health tips) पातळी नेहमी नेहमी वाढत नाही. उन्हाळ्यात अधिक पिण्याचा सल्ला दिला जातो कारण ते आपले संरक्षण करते. विशेषतः समुद्राच्या सभोवतालचे वातावरण दमट असते, त्यामुळे नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराचे निर्जलीकरण होणार नाही. यासोबतच यामध्ये अनेक पोषक घटक तत्वे हे असतात जे आपल्या सर्वांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

जो व्यक्ती नियमितपणे नारळाचे पाणी पितो तो इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करतो. अनेक संशोधने आणि अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की इलेक्ट्रोलाइट्स ही खनिजे आहेत जी आपल्या शरीराला ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

नारळ पाणी मधुमेहासाठी फायदेशीर आहे का?

नारळपाणी मधुमेहींसाठी फायदेशीर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नारळाच्या पाण्याची चव सौम्य गोड असते. त्यात नैसर्गिक साखर असल्याने हे पेय मधुमेहींसाठीही आरोग्यदायी आहे की रक्तातील साखरेची पातळी वाढवणार असा प्रश्न पडतो.(Diabetes health tips)

ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये काम करणारे प्रख्यात आहारतज्ञ आयुषी यादव यांनी झी न्यूजला सांगितले की, नारळाचे पाणी पिणे साधारणपणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. अनेक प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की ते आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते. नारळाच्या पाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ पेक्षा कमी आहे त्यामुळे ते मधुमेहींसाठी हानिकारक नाही. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही रोज किती पाणी प्यायचे ते आधी ठरवा आणि नारळ पाणी पिण्यास लगेच सुरुवात करा.

 

 

Comments are closed.