HSC Exam Paper 2023 : बारावीच्या पहिल्या दिवशी पेपरमध्ये मोठी चूक..! या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 6 गुण मिळतील

Last Updated on February 21, 2023 by Jyoti S.

HSC Exam Paper 2023

बारावीची परीक्षा पेपर(HSC Exam Paper 2023) : राज्यातील बारावी बोर्डाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे, मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आधीच चुका आढळून आल्या आहेत. परिणामी आता राज्य मंडळाला प्रश्नपत्रिकेतील चुकांसाठी सर्व विद्यार्थ्यांना सहा गुण द्यावे लागतातच . मात्र, राज्य मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिकेच्या छपाईतील चुकीचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

राज्य मंडळातर्फे प्रत्येक वर्षी घेण्यात येणारी बारावीची परीक्षा(HSC Exam Paper 2023) आजपासून सुरू झालेली आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा पहिला पेपर इंग्रजी होता. या पेपरमधील कवितेवर आधारित तिसऱ्या क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाने छापलेले नाहीत त्यात त्यांनी डायरेक्ट उत्तरच दिले . त्यामुळेच प्रश्न विचारण्याऐवजी तिथेच उत्तर छापले आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे तीन प्रश्न दोन गुणांचे असून एकूण सहा गुणांचे प्रश्न आहेत. hsc परीक्षेचा पेपर

यासंदर्भात सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत राज्य मंडळाला विचारले असता त्यांनी प्रश्नपत्रिकेच्या छपाईमध्ये चूक झाल्याचे सांगितले. प्रश्नपत्रिकेत तीन क्रमांकाच्या चुका असल्याचे इंग्रजी शिक्षकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी सुरू झाली! नाशिक जिल्यासह लाभार्थी यादी डाउनलोड करा.आणि आपले नाव शोधा.

प्रश्नपत्रिकेत छपाईमध्ये त्रुटी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न छापले जात नाहीत, एका प्रश्नाऐवजी फक्त उत्तर छापले आहे. यासंदर्भामध्ये परीक्षा नियंत्रक, तसेच मुख्य नियंत्रक यांच्याकडून अहवाल घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रश्नातील चूक पाहून संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या मान्यतेनंतर 6 गुण दिले जातील. HSC Exam Paper 2023