
Last Updated on November 22, 2022 by Taluka Post
केप केनावेरल: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहिमेतील ‘ओरायन’ नामक चांद्रयान सोमवारी चंद्राजवळ पोहोचले. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ओरायन पृथ्वीच्या या उपग्रहाच्या पृष्ठभागापासून अवघ्या १२८ किमी अंतरावरून गेले. हे सर्वात कमी अंतर आहे. मानवाला पुन्हा चंद्रावर पाठविण्याच्या नासाच्या महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस’ मोहिमेतील हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे.
चंद्राच्या सतत अंधारात असणाऱ्या दक्षिण ध्रुवाजवळून ‘ओरायन’ चांद्रयानाने यशस्वी प्रवास केला. या काळात जवळपास यासाठी बानांबाहेर होते. चंद्राच्या अंधारात असलेल्या भागातून यान समोर येईपर्यंत त्याची
अवस्था काय आहे, याबाबत ह्युस्टनमधील नियंत्रकांनादेखील काहीही कल्पना नव्हती. परंतु यान जवळपास १२८ किमी अंतरावरून यशस्वी प्रवास करत समोरच्या भागात आले. नासाने जवळपास ५० वर्षांपूर्वी राबवलेल्या अपोलो कार्यक्रमानंतर चंद्राजवळ नासाचे यान पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. गत बुधवारपासून सुरू झालेल्या ‘आर्टेमिस’ मोहिमेच्या प्रवासातील हा मैलाचा दगड मानला जात आहे. अपोलो मोहिमेअंतर्गत वापरण्यात आलेल्या मार्गावरून ओरायनने प्रवास करत छायाचित्र टिपण्याचे काम केले. संपर्कात आल्यानंतर या यानाने हे छायाचित्र पृथ्वीवर पाठवले. ‘हा तो दिवस आहे ज्याबद्दल आपण बऱ्याच काळापासून विचार आणि चर्चा करत होतो, अशा भावना फ्लाइट संचालक झेब स्कोविले यांनी व्यक्त केल्या. सर्व काही व्यवस्थित राहिले तर कॅप्सुल शुक्रवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. चंद्राभोवती प्रदक्षिण घालताना ओरायनचे चंद्राच्या पृष्ठभागापासून सर्वाधिक अंतर ६४ हजार किमी असेल. हेही वाचा: नरेंद्र मोदी-ऋषी सुनक : मोदी भेटले आणि झाले काम
Comments are closed.